सतीश वैजापूरकरसंतकवी दासगणू महाराजांनी ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या छोट्या आरतीची रचना केली. त्यांनी शिर्डीत पंढरपूर अन् साईबाबांत विठोबा पाहिला. एका अर्थाने साईंची शिर्डी ही पंढरीचे प्रतिरूप समजली जाते..आपल्या देशात साईबाबांचे असंख्य भक्तगण आहेत. साईबाबा अद्भुत सत्पुरुष होते. अपूर्व योगसामर्थ्य, त्यांच्या उदीच्या दिव्य प्रभावामुळे बाबांना शिर्डीचे धन्वंतरी असेही संबोधले जाई. बाबांच्या हयातीतही बाबांचा भक्तगण मोठा होता. त्यावेळी बाबांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तीपैकी काहींनी चमत्कार अनुभवले.बाबांच्या जन्माविषयीचे तपशील कोणासही कधी समजले नाहीत. ते सत्पुरुष होते एवढेच त्यांच्या भक्तांना माहीत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधींसाठी हिंदू व मुस्लिम यांच्यात मतभेदही झाले; परंतु त्या वेळच्या कोपरगावच्या तहसीलदारांनी मतदान घेऊन हा प्रश्न सोडविला व बुटी यांच्या वाड्यात त्यांची समाधी बांधण्यात आली.‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रध्दा व सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांचे शिर्डीतील समाधी मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक. गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा आणि भाविकांसाठी सर्वाधिक सेवा-सुविधा देणारे देवस्थान अशी शिर्डी देवस्थानाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. देशविदेशातील सुमारे चाळीस हजारांहून अधिक भाविक साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज शिर्डीत येतात. शाळा, ऑफिसला सलग जोडून सुट्ट्या असतील, तर त्याकाळात देशाच्या विविध प्रांतांतून येणाऱ्या भाविकांची गर्दी उसळते. येथे येणाऱ्या भाविकांत दाक्षिणात्य भाविकांची सर्वाधिक संख्या आहे.साईबाबांनी आयुष्यभर काखेत बांधलेल्या झोळीत घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आता त्यांच्या पश्चात देशविदेशातील त्यांचे भक्त या झोळीत भरभरून दान देतात. एका अर्थाने बाबांची झोळी कुबेराचे भांडार झाली आहे. आंध्र प्रदेशातील रेड्डी बंधूंनी साईबाबांना शंभर किलो सोन्याचे सुबक नक्षीकाम केलेले सिंहासन अर्पण केले आहे. चेन्नईतील दानशूर भाविक आणि एकेकाळचे प्रसिद्ध उद्योजक के.व्ही. रमणी यांनी सव्वाशे कोटी रुपये खर्चून शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज धर्मशाळा बांधल्या आहेत. नाममात्र दरात भाविकांची निवास व्यवस्था व्हावी या उद्देशाने त्यांनी या धर्मशाळा उभारल्या. साई संस्थानाचे वार्षिक स्थूल उत्पन्न आठशे कोटी रुपयांवर गेले. बाबांच्या तिजोरीत ५१३ किलो सोने, ६ हजार किलो चांदी, सुमारे पाच कोटी रुपये किमतीची परकीय गंगाजळी आहे.साई संस्थानाच्या उत्पन्नाबरोबरच खर्चदेखील मोठा आहे. ‘आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालय’ असा साई संस्थानाचा लौकिक आहे. येथे दररोज चाळीस हजारांहून अधिक भाविकांना मोफत भोजन आणि न्याहारी दिली जाते. प्रसादालयातील अन्नदानासाठी साई संस्थान वर्षाकाठी सत्तर ते पंचाहत्तर कोटी रुपये खर्च करते. साई संस्थानाच्या अन्नदान निधीसाठी भाविक देणगी देतात. येथे भांडी धुण्यासाठी, पोळ्या लाटण्यासाठी आणि भाजण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. सौर ऊर्जेचा वापर करून रोजचा स्वयंपाक केला जातो. येथे भाजी-पोळी, वरण-भात आणि बर्फी असा खास मराठमोळा बेत असतो. हा बेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एवढा आवडला, की त्यांनी येथील बल्लवाचार्यांच्या एका पथकाला राष्ट्रपती भवनात पाचारण केले. या पथकाने राष्ट्रपती भवनातील बल्लवाचार्यांना मराठमोळा स्वयंपाक शिकवला.साई संस्थानाची दोन रुग्णालये आहेत. त्यातील एक सुपरस्पेशालिटी रूग्णालय आहे. त्या रुग्णालयात सरकारी वैद्यकीय योजनांच्या आधारे हृदयापासून मेंदूपर्यतच्या अनेक शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनांद्वारे मिळालेल्या खर्चाहून अधिक खर्च झाला, तर बऱ्याचदा रुग्णांची आर्थिक परिस्थिती पाहून औषधांसह सर्व वाढीव खर्चदेखील माफ केला जातो. .साई संस्थानाच्या दुसऱ्या रूग्णालयात सर्व आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. ही दोन्ही रुग्णालये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी वरदान ठरली आहेत. येथे येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची निवास आणि भोजन व्यवस्था मोफत केली जाते.त्यामुळे येथे रुग्णांचा ओघ सतत सुरू असतो. गोरगरीब रुग्णांसाठी ही दोन्ही रुग्णालये मोठा आधार ठरली आहेत.येथे साई संस्थानाच्यावतीने भाविकांसाठी अत्यल्प दरात निवास व्यवस्था उपलब्ध आहे. साई संस्थान सतरा हजारांहून अधिक भाविकांच्या निवासाची व्यवस्था करते. दरडोई पन्नास रुपये भाडे असणाऱ्या खोलीपासून नऊशे रुपये भाडे असलेल्या सुइटपर्यंतची सर्व प्रकारची निवासस्थाने उपलब्ध आहेत.गर्दीच्या दिवसांत आणखी दहा ते बारा हजार भाविकांची तात्पुरती निवास व्यवस्था केली जाते. मोफत भोजन आणि सर्वात स्वस्त निवास व्यवस्था हे साई संस्थानाचे आणखी एक वैशिष्ट आहे. ज्या धर्मशाळा साई मंदिरापासून दूर आहेत, तेथून जाण्या-येण्यासाठी साई संस्थानाची मोफत बससेवादेखील आहे.पहाटे साडेचारपासून रात्री साडेदहा वाजेपर्यत साई मंदिर दर्शनासाठी खुले असते. या काळात साईबाबांची काकड आरती, मध्यान्ह आरती, धुपारती आणि शेजारती अशा चार आरत्या होतात. सकाळी ५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ५.५० वाजता मंगलस्नान, सकाळी ६.२५ वाजता दर्शन प्रारंभ, सकाळी ७ ते ९ व सकाळी ९ ते ११ या वेळात साई सत्यव्रत पूजा, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती, सूर्यास्ताच्या वेळी धुपारती, रात्री १० वाजता शेजारती असा नित्यक्रम असतो.आरतीच्या काळात रांगेतील भाविकांसाठी दर्शन बंद असते. दोनशे रुपये शुल्क देऊन सर्वांसाठी तातडीची दर्शन सुविधा उपलब्ध असते. आरत्यांसाठी वेगळे शुल्क आकारले जाते. काकड आरतीसाठी प्रतिव्यक्ती ६०० रुपये व्हीआयपी शुल्क, नित्य दर्शन २०० रुपये, साई सत्यव्रत पूजा १०० रुपये जोडी, मध्यान्ह आरती व शेजारती ४०० रुपये असे शुल्क आकारले जाते.भाविकांसाठी सुसज्ज दर्शनबारी हे येथील दर्शन व्यवस्थेचे वैशिष्ट आहे. वातानुकूलित असलेल्या या दर्शन बारीत भाविकांना बसण्यासाठी आरामदायी बाक, चहापाणी आणि नाश्त्याची सोय उपलब्ध आहे. स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. सुमारे सव्वादोनशे कोटी रुपये खर्च करून साई संस्थानाने ही सुसज्ज दर्शनबारी उभारली आहे.साईबाबांनी सुरू केलेला श्रीरामनवमी उत्सव येथे परंपरागत पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गावची यात्रादेखील असते. ग्रामस्थ आणि साई संस्थान मिळून हा उत्सव साजरा करतात. गुरुपौर्णिमा उत्सवदेखील बाबांच्या हयातीत सुरू झाला.तत्कालीन साईभक्तांनी गुरू या नात्याने बाबांचे पूजन करून या उत्सवास प्रारंभ केला. आज देश-विदेशातील हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात. राज्यातून आणि राज्याबाहेरून साईंच्या पालख्या घेऊन येणारे शेकडो पदयात्री भाविक हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट. विशेषतः मुंबईहून सर्वाधिक पालख्या येतात.विजयादशमी हा बाबांचा महानिर्वाण दिन असल्यामुळे या उत्सवाला भाविकांच्यादृष्टीने एक वेगळे महत्त्व आहे. साईबाबांनी आयुष्यभर भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. त्याचे प्रतीक म्हणून या उत्सवात भिक्षा झोळी कार्यक्रमाचे आयोजन करून बाबांच्या स्मृतींना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वंदन केले जाते. वरील तीनही उत्सव सलग तीन दिवस साजरे केले जातात. काल्याच्या कीर्तनाने प्रत्येक उत्सवाची सांगता होते..नारदीय कीर्तन परंपरा हे येथील उत्सवांचे आणखी एक वैशिष्ट. साईबाबांच्या काळापासून उत्सव काळात द्वारकामाई नारदीय कीर्तनाचे आयोजन केले जात असे. संतकवी दासगणू महाराज हे बाबांच्या नित्य सहवासात असत. एका उत्सवात ते नटून थटून कीर्तनास उभे राहिले.बाबांनी त्यांना ‘असा नवरदेवासारखा नटतोस काय!’ असे खडसावून नवे कपडे फेकून द्यायला सांगितले. त्यांनी बंडी बाजूला टाकून कमरेला धोतर आणि खांद्यावर पंचा टाकून कीर्तन केले, असे सांगतात. तेव्हापासून येथे प्रत्येक नारदीय कीर्तनकार अंगावर पंचा टाकून कीर्तन करतो. संतकवी दासगणू महाराजांनी ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या छोट्या आरतीची रचना केली. त्यांनी शिर्डीत पंढरपूर अन् साईबाबांत विठोबा पाहिला. एका अर्थाने साईंची शिर्डी ही पंढरीचे प्रतिरूप समजली जाते.साईंच्या शिर्डीसाठी राज्य सरकारने विमानतळ उभारले आणि केंद्र सरकारने रेल्वेस्थानक उभारले. आता समृद्धी महामार्ग शिर्डीजवळूनच जातो. दळणवळणाच्यादृष्टीने शिर्डीला जाणे सहज आणि सुलभ आहे. येथील धार्मिक पर्यटन तुलनेत अधिक स्वस्तदेखील आहे.(सतीश वैजापूरकर दै. सकाळचे शिर्डीचे बातमीदार आहेत.)--------------------------