विष्णू मनोहर
असं म्हणतात, की जिथं पाणी वाहतं तिथे संस्कृती निर्माण होते. आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला आहे तो नद्यांमुळे. गोदावरी, कृष्णा, भीमा, नर्मदा, तापी अशा जवळपास पन्नास लहान-मोठ्या नद्या आपल्याला लाभलेल्या आहेत. या नद्यांमुळे उदयाला आलेल्या अनेकविध संस्कृतींत चालीरीती, धर्म, संगीत, नाट्य, बोलीभाषा याबरोबर खाद्यपदार्थांचासुद्धा समावेश होतो.