हेमंत गोविंद जोगळेकर
मागील लेखांकात (ता. २७ एप्रिल) आपण शाहीर होनाजी बाळा यांच्या लटपट लटपट तुझं चालणं या लावणीचा आस्वाद घेतला होता. ही लावणी काहीशे वर्षांपूर्वीची. लावणीचा हा धागा कायम ठेवून या लेखात तुलनेने नव्या लावणीचा रस घेऊ या. लावणी आहे वसंत बापट यांची लावणी इवलीची.