Manali Road Trip: अमेझिंग स्पिती

Bike Rider दुसऱ्या दिवशी नवऱ्यासोबत बाइकवर जायचं ठरलं आणि मीही बाकी रायडर्सप्रमाणे रायडिंग जॅकेट, हेल्मेट असा सगळा जामानिमा केला
bike ride to manali
bike ride to manali esakal
Updated on

वर्षा जोशी-आठवले

बाइकवर बसून जाताना लक्षात आलं, की या प्रवासात चारही बाजूंनी आपण निसर्गाच्या सोबत असतो, जवळ असतो. तिथली हवा, पाऊस, वारं असा सगळा निसर्ग सर्व बाजूंनी आपल्याला स्पर्श करत असतो. त्यातूनही मागं बसणाऱ्याला नजरेनं आजूबाजूचं बरंच काही टिपता येतं, डोंगरावरची छोटी झाडं असोत, गवत असो, गवतफुलं असोत किंवा डोंगरांचे आकारउकार असोत. सगळंही काही नजरेच्या टप्प्यात.

बाइक रायडिंग करणारी बहीण स्वप्ना आणि तिचा ग्रुप स्पिती व्हॅलीत रायडिंगसाठी चालले होते. तिचा फोन आला. तू आणि अजितही (माझा नवरा) चला. म्हटलं, ‘अगं तो राइड तरी करेल. मी काही बाइक चालवत नाही. मी काय करू?’ तर अजून एका रायडरची बायको आणि इतर दोघी गाडीतून येणार होत्या. मग बहिणीचं म्हणणं, तू हवं तेव्हा डबल सीट येऊ शकतेस आणि एरवी गाडीतून जाता येईलच. हो-नाही करता करता मी हो म्हणाले आणि या ‘हो’चं सार्थक झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.