डॉ. महेश मनमोहन कुळकर्णीडॉ. किरण मालशेडॉ. मंदार खानविलकरआंबा हे एक वैशिष्ट्यपूर्ण फळ आहे. हापूसच घ्या. हापूसमध्ये जागा बदलली, की स्थानिक हवामान व जमिनीच्या बदलामुळे फरक पडत जातो. जागेनुसार मग फळाची चव, आकार व रंगही बदलतो..आंब्याचा सीझन सुरू झाला, की जणू एखादा महोत्सव सुरू झाल्याचा फील येतो. आंबा हे आबालवृद्धांचे सर्वात आवडते फळ असून इतर कुठल्याही फळांशी तुलना केल्यास जातीवरून मागणी असलेले हे एकमेव फळ आहे. आई-वडील लहानपणी आपल्याला जो आंबा उत्तम आहे, असे सांगतात, आंब्याची तीच जात आपल्या मनात घर करून बसते. पण आंब्याचे उगमस्थान असलेल्या आपल्या देशात आंब्यांच्या ७५० हून अधिक जाती व ३०हून अधिक संकरित जाती आहेत, याची आपल्याला क्वचितच कल्पना असते.नैसर्गिक पद्धतीने वाढलेली आंब्याची झाडे संपूर्ण भारतात आढळतात. आंब्यांच्या वेगवेगळ्या जातींची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. स्थानिक जागांवरून (उदाहरणार्थ -बैंगनपल्ली, गोवा मानकुर, बेंगलोरा, दशहरी, हिमसागर, मालदा), आकारावरून (जरदाळू, वनराज, बदाई गोल, बजरंग, लंगडा, पंचदर कलशा, मंजिरा), रंगावरून (निलम, केसर, सुवर्णा, बॉम्बे ग्रीन, सोनपरी, सिंदरी, पुसा पितांबर, पुसा सूर्या, पुसा लालिमा), एखाद्या पदार्थावरून (दूधपेढा, सोरा, रसपूरी (पायरी), खोबरी, चिन्नारस्सम, पेढारस्सम, रॉयल स्पेशल, गुलाबखस, जरदालू), पशुपक्ष्यांच्या नावावरून (तोतापुरी, पावशा), प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावरून (अल्फान्सो, जहांगीर, फर्नांडिन, जमादार, मिंगेल, हिमायुद्दीन, मल्लिका, आम्रपाली, लिली, माया, हेडन, फकिरा, हॅमलेट, बजरंग), खाण्याच्या पद्धतीवरून (चौसा, चिन्ना रस्सम), मोहोर येण्यावरून (बारामसी, दो-फसली) खास लोणच्यासाठी (कोकण रुची, फुले अभिरुची, करेल) ही नावे ठेवली/ पडली आहेत. .आंबा हे एक वैशिष्ट्यपूर्ण फळ आहे. हापूसच घ्या. हापूसमध्ये जागा बदलली, की स्थानिक हवामान व जमिनीच्या बदलामुळे फरक पडत जातो. जागेनुसार मग फळाची चव, आकार व रंगही बदलतो. हापूसही बाटली हापूस, डोंगरी हापूस, बदामी, गुंडू, खादेर, पाटनाम जाती, आपस अशा नावांनी ओळखला जातो. या प्रत्येक जातीमध्ये काही गुण आहेत तसे दोषही आहेत. हे दोष काढण्यासाठी तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधकांनी संकरित जातींची निर्मिती केली आहे. उदाहरणच घ्यायचे तर हापूसमधील वर्षाआड येण्याचा व साक्याचा दोष काढण्यासाठी निलम आणि हापूसचा संकर असलेल्या रत्ना, सुवर्णा ह्या जाती, दशहरीमधील वर्षाआड उत्पन्न देण्याच्या दोषावर मात करण्यासाठी निलम आणि दशहरीचा संकर असलेल्या व अधिक उत्पादन देणाऱ्या आम्रपली आणि मल्लिका ह्या जाती, अशा ३०हून अधिक संकरित आंब्याच्या जाती आपल्या देशात विकसित करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी उपलब्ध असणाऱ्या स्थानिक रायवळ जातींसोबतच आंब्यांच्या काही परदेशी जातीदेखील आपल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ लागल्या आहेत.आंबा कितीही आवडता असला तरी आंब्यांच्या विविध जाती कशा ओळखायच्या हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. वर्षानुवर्षे हापूस खाणारी मंडळीही आपण खातोय तो आंबा नेमका कोकणातला की बाहेरचा याबाबत खात्री देऊ शकत नाहीत. कित्येकदा हापूसपासूनच तयार केलेल्या आंब्याच्या संकरित जातीही बाजारात हापूस म्हणूनच विक्रीला उपलब्ध असतात आणि सारखेपणामुळे आपण हापूस म्हणून त्या घेतोही. पूर्वी गुढीपाडव्याला किंवा अक्षय्य तृतीयेला हापूस विकत घेण्याची पद्धत होती. पावसाळ्यानंतर पडलेल्या थंडीमुळे कोकणातील खाडीलागतच्या आंबाबागांत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आलेला मोहोर ९० ते ११० दिवसांत पक्व फळे देत होता. ह्याला निसर्गाबरोबरच शेतकऱ्याची प्रचंड मेहनतही कारणीभूत होती. परंतु आता स्पर्धा वाढलेली आढळते. जानेवारी महिन्यापासूनच बाजारात हापूस आंब्याला चढा दर मिळतो व त्यामुळे अनेकवेळा अपरिपक्व आंबा काढून रसायनाच्या साहाय्याने तो पक्व करून बाजारात पाठवला जातो. रसायनांमुळे त्या आंब्याला रंग येतो पण पिकलेल्या फळाप्रमाणे चव येत नाही. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी आंब्यांची नैसर्गिक पक्वता वाढत जाते व फळाला चवदेखील येते. त्यामुळेच आंबा विकत घेताना जागरूक ग्राहकाने खात्रीशीर बागायतदाराकडून थेट माल घेतला पाहिजे. तसेच फळ तपासूनच पेटी घेतली पाहिजे. .आंब्याच्या व्यवसायात आंब्याच्या तोडणीला विशेष महत्त्व आहे. ती एक कला आहे. हापूस आंब्यांची मोहोराची प्रक्रिया २ ते ३ महिने चालू असते. त्यामुळे लक्ष देऊन कमीतकमी ४ ते ५ वेळा तोडणी करावी लागते. हापूस आंब्याची फळे आंबा बागायतदार आणे पद्धतीने काढतो. दहा आण्यांपासून फळे काढायला सुरुवात करतात. परंतु शास्त्रीयदृष्ट्या उत्तम स्वाद, रंग, टिकाऊपणा व चव निर्माण होण्यासाठी १२ आणे तयार आंबा काढणे आवश्यक आहे. ह्या स्टेजला आंबा गोलाकार रूप घेतो, आणि फळ देठाजवळ हलकेसे खोलगट होऊन दोन्ही बाजूचे खांदे तयार होतात. सोळा आणे स्टेजला आंबा झाडावर पूर्ण तयार होतो, त्याची आंबटगोड चव अवर्णनीय असते. त्याला झाडपिका किंवा पाडाचा आंबा असेही म्हटले जाते. हापूस आणि केशर आंबा जसा तयार होत जातो तसा फळाच्या बाहेरील त्वचेवर असलेले लेंटिसेल्स रुंदावतात. आंब्याची बाहेर आलेली चोच बोथट होते. रत्ना जातीचा आंबा हा पिवळट हिरवा असताना पिकलेला असतो व त्याची साल जाड असते तसेच सिंधू जातीच्या आंब्याची कोय अतिशय पातळ असते. रसासाठी वापरल्या जाणाऱ्या पायरी आंब्याची चोच ठळकपणे बाहेर आलेली असते. अतिपिकले फळ उतरते, मऊ पडते. आंब्याच्या अशा नानाविध जाती आपल्याला आंबा प्रदर्शनात पाहायला मिळू शकतात.आपल्याला सर्वाना हे माहीतच असेल, की कोकणातील हापूस आंब्याला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. या जीआय मानांकनाबाबत आंबाप्रेमींमध्येही जागरूकता येणे गरजेचे आहे. ग्राहकांनी जर जीआय मानांकित आंबा बागायतदारांकडूनच खरेदी करण्याचा आग्रह धरला तर आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणावर जीआय मानांकन करून घेतील, परिणामी दाम मोजूनही उत्तम फळ न मिळाल्याने ग्राहकांच्या पदरी पडणारी निराशाही टळेल.यानिमित्ताने एक सुचवावेसे वाटते, वर्षानुवर्षे आपल्याला आंबा देणाऱ्या आंबा बागायतदाराकडूनच आंबे खरेदी करा आणि शक्य असल्यास सीझनमध्ये त्या बागायतदाराच्या बागेला भेट द्या, त्यालाही बरे वाटेल. आपल्यालाही प्रत्यक्षात आंबा ओळखणे शिकता येईल. शेवटी स्वतःच्या हाताने काढलेल्या आंब्याची गोडी काही औरच लागेल, नाही का? .आंब्यांच्या काही संकरित जातीरत्ना: निलम आणि हापूस जातींचा संकर. दरवर्षी गोड फळ देणारी जात. साकाविरहित. मोठा आकार. २५० ते ३०० फळे प्रति कलम. खाण्यासाठी व प्रक्रिया पदार्थ करण्यासाठी उत्तम.सिंधु: रत्ना आणि हापूस जातींचा संकर. अतिशय पातळ बाठ्याचे मध्यम आकाराचे फळ, कोयविरहित (सिडलेस) म्हणून प्रसिद्ध. दरवर्षी झुपक्यांत गोड फळ देणारी जात. साकाविरहित केशरी घट्ट गर. २०० ते २५० फळे प्रति कलम. खाण्यासाठी व प्रक्रिया पदार्थ करण्यासाठी उत्तम.कोकण सम्राट: हापूस आणि टॉमी अॅटकिन्स जातींचा संकर. दरवर्षी झुपक्यात गोड फळ देणारी जात. साकाविरहित. मोठा आकार. २५० ते ३०० फळे प्रति कलम. खाण्यासाठी व प्रक्रिया पदार्थ करण्यासाठी उत्तम.सोनपरी: हापूस आणि बानेशन जातींचा संकर. दरवर्षी गोड फळ देणारी जात. साकाविरहित. मध्यम आकार. १०० ते १५० फळे प्रति कलम. खाण्यासाठी उत्तम.आम्रपाली: दशहरी आणि निलम जातींचा संकर. दरवर्षी उशिरा गोड फळ देणारी बुटकी जात. घनलागवडीसाठी उत्कृष्ट. २५० ते ३०० फळे प्रति कलम. चोचीकडे निमुळता होत जाणारा आकार.याचबरोबरीने भारताबाहेरील लिली, ऑस्टिन, टॉमी अॅटकिन्स, किट, केंट, तैवान, माया आणि आयर्विन या जातीदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.(लेखकत्रयी दापोली येथील डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत आहे.)--------------.लग्नसराईच्या दिवसात एक ग्रॅम सोन्याला आलीये चांगलीच झळाळी..! पण एक ग्रॅम सोनं वापरून ज्वेलरी कशी तयार केली जाते? .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.