Manoj Bajpayee Interview : ३० वर्षाची कारकीर्द, शंभरावा चित्रपट मनोज वाजपेयी म्हणाले..'श्रेय माझ्या दिग्दर्शकांना'

मनोज या क्षेत्रात तीन दशके अफलातून काम करतो आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला भैय्या जी हा चित्रपट मनोज वाजपेयीचा शंभरावा चित्रपट
Manoj Bajpayee
Manoj Bajpayee esakal
Updated on

पूजा सामंत

फॅमिली मॅन, सायलेन्स, सिर्फ एक बंदा काफी है या वेब मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या सरस अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. मनोज या क्षेत्रात तीन दशके अफलातून काम करतो आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला भैय्या जी हा चित्रपट मनोज वाजपेयीचा शंभरावा चित्रपट आहे. त्यानिमित्त त्याच्याशी मारलेल्या गप्पा..

Q

भैय्या जी तुझ्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा. तुझ्या कारकिर्दीला ३० वर्षे पूर्ण होताहेत, आणि तुझी पत्नी नेहा ऊर्फ शबाना वाजपेयी तुझ्या शंभराव्या चित्रपटाची निर्माती आहे. काय भावना आहेत?

A

मनोज वाजपेयी - मी बिहारच्या चंपारण्यमधील बेतिया या लहान गावातून, व्हाया दिल्ली एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) मुंबईला आलोय. मी मुंबईत यावे, अभिनयात स्वतःला आजमावावे, अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा नव्हतीच.

खेड्यापाड्यात वाढलेल्या, बेताचे इंग्रजी आणि देहाती हिंदी येणाऱ्या युवकाला मुंबईत कोण थारा देणार, असा सुज्ञ आणि व्यवहारी विचार त्यांनी केला. म्हणूनच माझे विचार त्यांना पटले नाहीत. दोन-चार चित्रपट, काही किरकोळ भूमिका पदरी पडतात का ते पाहावे म्हणून मी मुंबईत आलो. वर्षभर संघर्ष करायचा असे मी निश्चित केले होते, नाहीच जमले तर गावचा रस्ता पकडायचा. पण सगळे वेगळे अनपेक्षित घडत गेले.

तेव्हा मी या क्षेत्रात ३० वर्षे राहीन, १०० चित्रपट पूर्ण करेन हे अशक्य कोटीतील होते. हा विचारही माझ्या मनात येणे शक्य नव्हते. मुंबईत कधी माझी डाळ शिजेल असे मला स्वप्नातही वाटले नाही. म्हणूनच मी माझ्या करिअरमध्ये आलेल्या टर्न ॲण्ड ट्विस्टच्या धक्क्यांनी सद्‍गतीत होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.