प्रशांत गिरबने
महाराष्ट्रातील मुंबई-पुणे शहरांमधून स्टार्टअप्सना बळ मिळत आहे. या शहरांमध्ये त्यासाठी निश्चितच अधिक अनुकूल वातावरण आहे. राज्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरी विमानतळ, पायाभूत सुविधा, नेटवर्कचे जाळे आणि महिलांसाठी विशेष सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ॲग्रिकल्चर' (एमसीसीआयए) नवउद्योजकांना मदत करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.