डॉ. स्नेहल कुलकर्णी
गझल हा काव्यप्रकार अरबी-फारसी भाषेतून उर्दूत आला, उर्दूतून मराठी भाषेत आला. मराठीतील पहिली उपलब्ध गझल उत्तर पेशवाईत होऊन गेलेल्या अमृतराय या कवीच्या नावावर आढळते. नंतरच्या काळातील माधव जूलियन व अलीकडच्या काळातील सुरेश भट या गझलकारांनी मराठीत गझल हा काव्यप्रकार रुजवला, लोकप्रिय केला.
गझलेचा इतिहास खूप जुना आहे. गझल या काव्यप्रकाराचा प्रदीर्घ प्रवास अरबी-फारसीतून उर्दूत झाला, असे सांगण्यात येते. गझलेच्या अनेक व्याख्या उर्दू -फारसी साहित्यात उपलब्ध आहेत. प्रेयसीशी संवाद म्हणजे गझल, ही गझलेची मूळ संकल्पना!