गीतातून नाद, रंग, गंध, दृश्य, स्पर्श सर्वच संवेदना आपल्या प्रत्ययाला येतात. निसर्ग आणि प्रीतभावना महानोर यांच्या गीतांत जणू एकच होऊन जातात -ओथंबून आलेला घन आणि छेलछबीला साजण हे दोघेही उत्कट प्रेम करतात. एक वेगळीच अनुभूती महानोरांचे हे गीत आपल्याला देते.