मराठी ही महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे; प्रा. यास्मिन शेख यांच्या शंभरीच्या निमित्ताने

भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही. ती महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे
prof. Yasmin shaikh marathi language expert
prof. Yasmin shaikh marathi language expert Esakal
Updated on

भानू काळे

भाषेच्या संदर्भात शेखबाईंची काही आग्रही मते आहेत. आपल्या प्रिय कामातून मिळत असलेली ऊर्जा हेच बहुधा या वैयायोगिनीच्या चिरतारुण्याचे रहस्य असावे.

वर्षातील सर्वांत मोठा दिवस म्हणजे २१ जून. अलीकडे हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणूनही साजरा होतो. पण या दिवसाचे यंदाचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांनी वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण केले.

वाढत्या आयुर्मानाच्या आजच्या काळातही हे तसे विशेषच म्हणावे लागेल. सर्वच मराठीप्रेमींसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नव्वदीनिमित्त २०१५ साली त्यांचा एक अनौपचारिक खासगी सत्कारसमारंभ त्यांच्या दोन मुलींनी योजला होता.

त्यावेळी अंतर्नाद मासिकाच्यावतीने शेखबाईंचा सत्कार करताना साताऱ्याहून नव्वद कंदी पेढ्यांचा हार घेऊन खास आलेले डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले होते, “शेखबाईंकडे बघितल्यावर वाटते, की नाइण्टी तो झांकी है, सेन्चुरी अभी बाकी है! त्यांचा उत्साह बघितल्यावर वाटते, की तोही क्षण अजून दहा वर्षांनी नक्की येईल आणि त्यावेळीही आपण सर्व असेच इथे एकत्र येऊ!” दाभोळकरांना अभिप्रेत असलेला तो सुवर्णक्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे.

यंदाच्या २१ जून रोजी झालेल्या सत्काराला उत्तर देताना शेखबाईंनी जे भाषण केले त्याचा शेवट त्यांनी नेहमीप्रमाणे “जय महाराष्ट्र! जय मराठी!” या शब्दांनी केला. त्यांच्या एकूण जीवनाचे उद्दिष्टच जणू त्यांनी त्या शब्दांतून व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com