कवितेनेच आपल्याला सावरले आहे असे डॉ. संगीता बर्वे आपल्या कवितेतून सांगतात. ‘ही नाहीच मी’ असे कविता आणि आपण यांचे वरकरणी द्वैत सांगता-सांगता
मला वाटतं आभाळभर जावो
तिचा सुगंध
तिच्या डोळ्यांतून टपटपणाऱ्या कळ्यांची
जाई होवो
बाईच्या जन्माची कहाणी
याच जन्मी सुफळ संपूर्ण होवो
असे पसायदान त्या मागतात.