प्रथमेश किशोर पाठक
सोशल मीडिया येण्यापूर्वी छापून आलेल्या कविता वाचल्या जात. एकदाही न पाहिलेल्या कवीच्या कवितेवर घमासान चर्चा रंगत. कवी-लेखकांशी पत्रव्यवहार होत असत. आता बदलत्या काळानुसार रसिक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कवीशी, लेखकाशी कनेक्ट होतात. कवितेत चिंब भिजवणारे सादरीकरणाचे कार्यक्रमही नव्या पिढीला आकर्षित करत आहेत.
चौदा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. कविता आवडणारा माझा एक मित्र मला म्हणाला होता, “आम्हाला कविता वाचायला नाही, ऐकायला आवडतात.” हे वाक्य अगदी साधं वाटत असलं तरीही फार सूचक आहे. या वाक्यात त्या काळातली मानसिकता दिसते आहे. मानसिकता अशी, की कवितांवरील प्रेम तर कमी झालं नाहीये (कदाचित) पण कवितांच्या आपल्या आयुष्यातल्या प्रवेशमार्गाचं निश्चितीकरण करण्यात आलेलं आहे.