प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के
मराठवाड्यास ‘मंदिरवाडा’ म्हणता येईल इतकी विपुल मंदिरे या प्रांतामध्ये आढळून येतात. मराठवाड्यात चांगल्या स्थितीत २५०पेक्षा अधिक मंदिरे असून जीर्ण अवस्थेतील अनेक मंदिरे निसर्गाचा मारा सहन करीत अजूनही तग धरून आहेत. मराठवाड्यातील काही प्रमुख मंदिराच्या बाह्यांगावरील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकलेचा उल्लेख करणे अप्रस्तुत ठरणार नाही.