अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
दऱ्याखोऱ्यातील रेखीव शेती, मधेच असलेली छोटी घरे, जागोजागी दिसणारे हिरवे पुंजके आपल्या मनात घर करून जातात. म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगांचा सर्वात पूर्वेकडचा भाग असून, त्याला विलक्षण सुंदर - पर्वतरांग लाभली आहे. तुम्हाला येथे विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे प्रकार पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगण राज्याच्या कानाकोपऱ्यांतून तीर्थक्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात.