मुकुंद भोगले / अश्विनी देशपांडे
शहराचं किंवा देशाचं हेतुपुरस्सर ब्रॅण्डिंग करण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना उचल मिळावी, हा सर्वांत लोकप्रिय उद्देश म्हणता येईल. तसंच आजकाल शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करणं ही सामान्य बाब झालेली आहे; तेव्हा उत्तमोत्तम व्यक्तींना आकर्षित करून घेण्यासाठीही शहरं आपापल्या प्रतिमा भक्कम करायला पुढे सरसावली आहेत. योग्य ब्रॅण्डिंगद्वारे त्या परिसरातील जमिनीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असते.