डॉ. रवींद्र बेम्बरे-
साधुसंत आणि तपस्वी साधकांची भूमी म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. विविध संप्रदायांच्या साधुसंतांची समृद्ध परंपरा मराठवाड्याला लाभली. मराठवाड्याचे सांस्कृतिक आणि वैचारिक वैभव म्हणून येथील संतपरंपरेकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि वाङ्मयीन जडणघडणीमध्ये मराठवाड्यातील संतांचे मौलिक स्वरूपाचे योगदान आहे.