साप्ताहिक
Marriage Footwear : बजेटपेक्षा कम्फर्ट महत्त्वाचा!
Kolhapuri Footwear : लग्नातली साडी नऊवारी असो, पाचवारी असो किंवा आणखी कोणत्या प्रकारची असो, त्यावर कोल्हापुरी चप्पल उठून दिसतेच! हल्ली पारंपरिक कोल्हापुरी चपलांना आधुनिक डिझाईनचा टच असतो.
तनिष्का डोंगरे
दिवाळी झाली की लग्नसराईचा उत्साह पसरतो. दिवाळीच्या खरेदीबरोबरच काहीजण लग्नाची खरेदीसुद्धा करतात. गेल्या काही वर्षांपासून लग्नातल्या प्रत्येक विधीसाठी केलेल्या वेगवेगळ्या पेहरावासोबत फूटवेअर मॅच करण्याचा ट्रेंड आहे.
अर्थातच यामुळे पेहरावाची शान आणखीनच वाढते. या ट्रेंडचा वाढता परीघ लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनीही फूटवेअरमध्ये प्रचंड व्हरायटी आणायला सुरुवात केली आहे. दरवर्षी बदलणाऱ्या फूटवेअर ट्रेंड्समुळे बाजारात अनेकविध प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे वधूंना मनपसंत फूटवेअर निवडणं आता सोयीचं झालं आहे.