डॉ. अविनाश भोंडवे
आजमितीला जगभरातील ८.५ टक्के बालकांचे आई-वडील एकमेकांच्या जवळच्या नात्यात आहेत. जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या समुदायांमध्ये जवळच्या नात्यात लग्ने होताना आढळतात. मात्र मानवजातीच्या सामाजिक आणि जैविक विकासासाठी अशी लग्ने शास्त्रीयदृष्ट्या निषिद्ध मानली जातात.