या काळात शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. हे बदल फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिकही असतात. संतुलित, चौरस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीमुळे रजोनिवृत्तीचा टप्पा सहज आणि शांतपणे पार पडतो. रजोनिवृत्तीसाठी खास असा वेगळा आहार अस्तित्वात नाही. तरी, पोषक चारीठाव जेवणखाण महत्त्वपूर्ण ठरते.