वैद्य योगेश बेंडाळे
आयुर्वेदाची आखणी सद्यःकाळातील समजानुसार नसल्यामुळे बरेचदा आयुर्वेद समजण्यात गोंधळ अथवा गैरसमज होऊ शकतात. कोणतेही शास्त्र प्रवाही असले तरच ते जिवंत राहते. आयुर्वेदही यास अपवाद नाही.
गरज आहे ती विविध वैद्यकीय तसेच इतर शास्त्रीय शाखांतल्या विद्वानांनी एकत्र येऊन भारतात जन्मलेल्या आणि विकसित झालेल्या या शास्त्राचा आधुनिक काळास अनुसरून संशोधन व विकास करण्याची. असे झाल्यास आपण संपूर्ण जगामध्ये पुन्हा एकदा आपला विज्ञानाधिष्ठित ठसा उमटवू शकतो.