केतकी जोशी
मान्सून ब्लूज हा काही आजार नाही. ती फक्त एक अवस्था आहे, पार होऊ शकणारी. मान्सून ब्लूजची लक्षणं जाणवत असतील, तर व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात लाजू नका. घरच्यांशी बोला. तुम्हाला आवडतील त्या गोष्टी करा. थोडा वेळ तरी घराबाहेर पडून नैसर्गिक प्रकाश घ्या. एकूणच स्वतःकडे थोडंसं जास्त लक्ष द्या.
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो...