सुरक्षित भटकंतीसाठी...
पावसाळा सुरू झाला, की सर्वांना भटकंतीचे वेध लागतात. पाऊस व हिरवागार निसर्ग अनुभवण्याची सर्वांचीच इच्छा असते. सह्याद्रीमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत असतो. या उत्साही वातावरणात अनेकजण पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडतात.
पाऊस जसा जोर धरतो तसे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतात, धबधब्यांचा जोर वाढतो. गड किल्ल्यांवर, डोंगरांवर दाट धुके असते.
त्यामुळे पावसाळ्यात पर्यटन करताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळी पर्यटन स्थळांवर काळजी घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. हे अपघात काहीवेळा मानवी चुकांमुळे तर काहीवेळा नैसर्गिक आपत्तींमुळे होतात.
पावसाळ्यात भटकंती करताना काय काळजी घ्यावी, भटकंतीत कोणते धोके असू शकतात यासंदर्भाने पावसाळी पर्यटन करणाऱ्या सर्वांसाठी या काही सूचना. या सूचना जरूर वाचा, त्यांचे पालन करून आपल्या पावसाळी भटकंतीचे आयोजन योग्य प्रकारे करा आणि भटकंतीचा आनंद द्विगुणित करा.