Lactose intolerance :सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोक असतात लॅक्टोजमुळे पीडित, असा करावा आहारात बदल

स्तन्यपान देणाऱ्या मातेच्या दुधातदेखील लॅक्टोज आढळते आणि जवळजवळ प्रत्येक लहान अर्भक ते पचवण्याची क्षमता घेऊन जन्माला येते.
Health
Health Sakal
Updated on

लॅक्टोज म्हणजे नक्की काय? लॅक्टोज ही एक प्रकारची साखर आहे आणि ती नैसर्गिकरित्या बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळते.

स्तन्यपान देणाऱ्या मातेच्या दुधातदेखील लॅक्टोज आढळते आणि जवळजवळ प्रत्येक लहान अर्भक ते पचवण्याची क्षमता घेऊन जन्माला येते.

पाच वर्षांखालील मुलांमध्ये लॅक्टोज असहिष्णुता अत्यंत दुर्मीळ आहे. परंतु, वय वाढत जाईल तशी तशी ही क्षमता कमी होत जाते आणि काहींमध्ये खूपच कमी होते.

सुकेशा सातवळेकर

लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणजेच दुग्धशर्करा असहिष्णुता किंवा संवेदनशीलता. लॅक्टोजचे पचन न होता, ते लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जाते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

मात्र, अशी लक्षणे दिसत असली तरी प्रत्येक वेळी लॅक्टोज असहिष्णुता हेच कारण असेल असे नाही, हे लक्षात घ्यायला हवे. यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.

डाएट क्लिनिकमध्ये पोटाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या पेशंटच्या खाण्यापिण्याच्या वेळा, प्रमाण आणि पदार्थ यांच्यामध्ये आम्ही बदल करून बघतो. पण काही वेळा सगळे प्रयत्न करूनही आराम पडत नाही. तेव्हा त्यांना लॅक्टोज पचत नसल्याची शंका येते.

तुम्हाला माहीत आहे का? जगातील जवळजवळ सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोक लॅक्टोज इनटॉलरन्सने (असहिष्णुता) पीडित असतात. त्यांना कमी-अधिक प्रमाणात लक्षणे जाणवत असतात, पण त्यामागचे खरे कारण त्यांच्या लक्षात आलेले नसते.

साधारणपणे कोणती लक्षणे असू शकतात? तर पोटदुखी, पोट फुगणे, गॅसेस होणे किंवा अतिसार जाणवू शकतो. लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणजेच दुग्धशर्करा असहिष्णुता किंवा संवेदनशीलता, ही एक सर्वसाधारण परिस्थिती आहे.

ही तक्रार असणारे लोक जेव्हा दूध पितात किंवा दुग्धजन्य पदार्थ खातात तेव्हा त्यांना पचनाच्या समस्या जाणवतात. त्यामुळे त्यांच्या जीवनावर काही नकारात्मक परिणाम दिसून येतात.

Health
Mental Health : मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज करा ‘या’ गोष्टी

पण लॅक्टोज म्हणजे नक्की काय? लॅक्टोज ही एक प्रकारची साखर आहे आणि ती नैसर्गिकरित्या बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळते.

स्तन्यपान देणाऱ्या मातेच्या दुधातदेखील लॅक्टोज आढळते आणि जवळजवळ प्रत्येक लहान अर्भक ते पचवण्याची क्षमता घेऊन जन्माला येते.

पाच वर्षांखालील मुलांमध्ये लॅक्टोज असहिष्णुता अत्यंत दुर्मीळ आहे. परंतु, वय वाढत जाईल तशी तशी ही क्षमता कमी होत जाते आणि काहींमध्ये खूपच कमी होते.

पचनादरम्यान लॅक्टोजचे विघटन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज स्वरूपातील साखरेत होते. नंतर ते रक्तप्रवाहात शोषले जाते आणि ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते. लॅक्टोजचे विघटन होण्यासाठी लॅक्टेज नावाचा एन्झाइम आवश्यक असतो.

लॅक्टेज एन्झाइमच्या कमतरतेमुळे लॅक्टोजचे पचन न होता, ते लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जाते आणि पचनाच्या समस्या तयार होतात. आतड्यात पाणी, आम्ल आणि वायूचे प्रमाण वाढल्यामुळे पोटदुखी किंवा पोट फुगण्याची भावना होते.

आतड्यांना सूज येते. काही लोकांमध्ये मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. लहान मुलांमध्ये काही वेळा अतिसाराचा त्राससुद्धा दिसून येतो. बद्धकोष्ठता हेही एक क्वचित प्रसंगी आढळून येणारे लक्षण आहे.

मात्र, ही सर्व लक्षणे दिसत असली तरी प्रत्येक वेळी लॅक्टोज असहिष्णुता हेच कारण असेल असे नाही, हे लक्षात घ्यायला हवे. यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. पोषणाचे किंवा पचनाचे इतर विकार, औषधांचा दुष्परिणाम तसेच संक्रमण किंवा आतड्यांचे विकार यांपैकी एखादे कारणही असू शकते.

Health
Winter Health Care : ‘क्लायमॅटिक चेंज सिझन’; सर्दी, खोकल्याचा घरोघरी ताप

काही अभ्यासशोधांनुसार, लॅक्टोज असहिष्णुता विकारात पोटाच्या तक्रारींशिवायसुद्धा काही लक्षणे दिसू शकतात. डोकेदुखी, थकवा, एकाग्रता कमी होणे, तोंडात वारंवार व्रण येणे, लघवीच्या समस्या किंवा स्नायू आणि सांधेदुखी, तसेच एक्झिमा असे त्रासही काही वेळा दिसू शकतात.

ही सर्वच लक्षणे इतरही काही विकारांत आढळून येत असल्यामुळे लगेचच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बंद करू नयेत, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अचूक निदान करून घ्यावे.

हे निदान तीन प्रकारे होऊ शकते- विशिष्ट रक्त चाचणी, हायड्रोजन श्वास चाचणी किंवा स्टूल ॲसिडिटी चाचणी. जनुकीय संरचना तपासून लॅक्टोज असिहिष्णुतेचे सर्वात अचूक निदान होते.

लॅक्टोज असहिष्णुता असेल तर आहारात कोणते बदल करावेत?

सामान्यतः दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजेच मलई, पनीर, खवा, चीज, आइस्क्रीम यांसारखे अतिप्रमाणात लॅक्टोज असणारे पदार्थ प्रतिबंधित करावे लागतात किंवा काही वेळा ते वर्ज्य करावे लागतात. खरेतर हा विकार असणारे बरेच लोक एक कप म्हणजे २४० मिलीलिटर दूध दिवसभरात थोडे थोडे घेतले तर पचवू शकतात.

एक कप दुधातून साधारणपणे १२ ते १५ ग्रॅम लॅक्टोज मिळते. एका अभ्यासशोधानुसार, हा विकार असणारे लोक दिवसभरात १८ ग्रॅमपर्यंत लॅक्टोज पचवू शकतात. पण ते दिवसभरात थोडे थोडे घेतले गेले तरच! काही लोक चहामध्ये थोडेसे दूध सहन करू शकतात, परंतु एकाच वेळी कपभर दूध पचवू शकत नाहीत.

बहुतेक सर्वांना दह्याने काहीच त्रास होत नाही. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात म्हणजेच उपयुक्त सूक्ष्मजीव! जे पचनासाठी मदत करतात.

हे लोक थोड्या प्रमाणात लोणीही खाऊ शकतात, कारण लोण्यामध्ये अत्यल्प प्रमाणात लॅक्टोज असते. २० ग्रॅम लोण्यामधून फक्त ०.१ ग्रॅम लॅक्टोज मिळते. तुपामध्ये तर जवळजवळ लॅक्टोज नसतेच.

Health
Women Health : प्रसुतीनंतर महिलांचे पोट का सुटते? वाढलेली ढेरी कमी कशी करायाची?

लॅक्टोज नक्की असते कशात?

गाईचे दूध, बकरीचे दूध, तसेच दही, पनीर, खवा, लोणी, आइस्क्रीम, चीज या सगळ्या पदार्थांमधून लॅक्टोज मिळते. दूध वापरून तयार केलेल्या इतर पदार्थांमध्येही लॅक्टोज असते. म्हणजेच बर्फी, मिठाई खव्यापासून तयार केलेली असल्यामुळे त्यात लॅक्टोज असते.

तसेच बिस्कीट, कुकी यामध्येही दूध वापरलेले असू शकते. त्यामुळे त्यांच्यामध्येपण लॅक्टोज असते. ब्रेड पेस्ट्री आणि केक यामध्ये लॅक्टोज असते.

ब्रेकफास्ट सिरियल, तयार सूप किंवा तयार सॉसमध्येही लॅक्टोज असते. सोअर क्रीम, सॅलड ड्रेसिंग्जमध्येही असते.

सॉसेज, हॉट डॉग्ज अशा प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थातही लॅक्टोज असते हे लक्षात ठेवायला हवे.

लॅक्टोजची तीव्र असहिष्णुता असलेल्या लोकांना हे सगळे पदार्थ प्रतिबंधित किंवा वर्ज्य करावे लागतात. अशा लोकांनी रोजच्या आहारात प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिकचा वापर केला, तर त्यांची लक्षणे काही प्रमाणात कमी होतात, असे एका अभ्यासशोधानुसार सिद्ध झाले आहे.

दही, आंबवलेले पदार्थ, किमची, कोंबुचा, सोअरक्रॉट अशा पदार्थांतून प्रोबायोटिक मिळते. तर, प्रीबायोटिक कांदा, लसूण, जवस, सफरचंद, केळी इत्यादी पदार्थांतून मिळतात. रोजच्या आहारात या पदार्थांचा वापर करायला हवा.

Health
Health Care News : बसून किंवा उभं राहून नव्हे, तर 'या' पद्धतीने औषध घेतल्याने होईल अधिक फायदा; जाणून घ्या

तीव्र लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांनी लॅक्टोजमुक्त आहार घेणे आवश्यक असते. गायी-म्हशीच्या किंवा बकरीच्या दुधाला पर्याय म्हणून लॅक्टोजमुक्त दूध म्हणजेच तांदळाचे दूध, बदामाचे दूध, नारळाचे दूध, ओटचे दूध किंवा काजूचे दूधही चालेल.

सर्वात चांगला पर्याय म्हणजे सोयाबीनचे दूध! या लोकांना दहीसुद्धा लॅक्टोजमुक्त वापरावे लागते. त्यांनी सोया दुधापासून किंवा बदामाच्या दुधापासून किंवा शेंगदाण्याच्या दुधापासून तयार केलेले दही वापरायला हवे.

काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये मात्र लॅक्टोजचे प्रमाण कमी असते, उदाहरणार्थ काफीर किंवा हार्ड चीज. यांचा वापर सौम्य लॅक्टोज असहिष्णुता असलेले लोक थोड्या प्रमाणात करू शकतात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतून चांगल्या दर्जाची प्रोटिन मिळतात, कॅल्शियम मिळते. लॅक्टोज असहिष्णुता असणाऱ्या लोकांनी हे पदार्थ रोजच्या आहारातून वर्ज्य केले, तर प्रोटिन आणि कॅल्शियमची कमतरता तयार होते.

तेव्हा त्यांनी प्रोटिनसाठी सोयाबीन, डाळी, कडधान्ये, तेलबिया, अंडी, मांस आणि माशांचा रोजच्या आहारात आवर्जून समावेश करावा. कॅल्शियमसाठी पालेभाज्या, नाचणी, तीळ, सोयाबीन इत्यादी पदार्थांचा समावेश जरूर करावा.

फॅड किंवा क्रॅश डाएटिंग करणाऱ्यांनी लॅक्टोज असहिष्णुता नसताना आहारातून लॅक्टोजयुक्त पदार्थ वर्ज्य केले, तर महत्त्वाच्या आहारतत्त्वांची कमतरता तयार होऊ शकते आणि ती भरून निघण्यासाठी प्रयत्नपूर्वक बदल करावे लागतात हे लक्षात ठेवावे.

---------------

Health
Lactose Free Milk हे 8 प्रकारचे दूध आहेत लॅक्टोज फ्री, बिनधास्त करा सेवन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.