पावसाळ्यात आसपासची गावे आणि टेकड्यांवर धुक्याची चादर असते. अतिशय शांत वातावरण आणि अरण्यांनी वेढलेले वैशिष्ट्यपूर्ण हवामान नवी मुंबईचा ‘नायगारा’ म्हणून पांडवकडा धबधब्याची ओळख आहे. पांडव वनवासात असताना त्यांनी या धबधब्याखाली अंघोळ केली, तेथे असलेल्या गुहेत विश्रांती घेतली, अशी आख्यायिका आहे.