तुषार माघाडे, नाशिकज्याच्या आगमनाने दुःख हरण होऊन सुख आणि समृद्धीची पेरणी होते. अशा लाडक्या ओंकारस्वरूप गणनायक, गणाधीश, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी यंदाही बाजारपेठेत जोरदार तयारी सुरू आहे. .गणपती सजावटीसाठी खरेदी करायची म्हटले, की तमाम नाशिककरांची पावले मेनरोड, शालिमारकडे वळतात. गणेशोत्सवात या बाजारपेठेची रौनक बघण्यासारखी असते. बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ आली, की येथे पाय ठेवण्यासही जागा उरत नाही.खरेदीसाठी उडालेली झुंबड बघून बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण किती आतुर असतात, याची जाणीव होते. आपली सजावट जरा हटके असावी, यासाठी प्रत्येकजण बाजारपेठ पालथी घालत असतो. भक्तगणांची निराशा होऊ नये म्हणून बाजारपेठही दरवेळी नावीन्यपूर्ण, कलात्मक साहित्य ग्राहकांच्या पुढ्यात मांडत असते.घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य या बाजारपेठांत मिळते. बऱ्याचदा ग्राहक ऑनलाइन काही डिझाईन्स बघून ठेवतात आणि त्यांचा शोध घेत या बाजारपेठेत घेतात.आजकाल ग्राहकांची ही बदलती मानसिकता बघून व्यापारीही त्यांची डिमांड पूर्ण करतात. ऑनलाइन जे जे नजरेस पडेल ते ते या बाजारपेठेत मिळेल, अशी येथील बाजारपेठांची ख्याती आहे.यंदा चिनी बनावटीच्या साहित्याला भारतीय बनावटीचे साहित्य तोडीस तोड ठरत आहे. यंदा प्लॉवर, हिटलॉन मखर ट्रेंडमध्ये राहील असे सांगितले जाते आहे. त्याचबरोबर ग्रीन ग्रास गालिचा प्रकार ग्राहकांच्या पसंतीक्रमात आघाडीवर आहे.फूल, मखर, मूर्ती सजावट, आकर्षक रोषणाई माळा, पडदे, कमानी यातील असंख्य प्रकार बाप्पाचे स्वागत चैतन्य, मंगलमय करण्यासाठी उपलब्ध आहेत.घरगुती गणपती सजावटीसाठी लागणारी मखरे, माळा, दिवे, फुले यांत यंदा प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे. फुलांमध्ये लूज फुले, वेल, मोगऱ्याच्या लडी, झेंडूच्या लडी, कापडांच्या लडी, फ्लॉवर लडी, हार, मोतीहार, लायटिंग हार, फ्लॉवर हार, लटकन, क्रीपर, गुलाब, जरबेरा फूल, वेल जाळी, वेल पीस असे विविध प्रकार उपलब्ध आहेत.त्याचबरोबर मॅटमध्येही अनेक प्रकार आहेत. चैनापती, फ्लॉवर, पत्ती मॅट, डेकोरेटिव्ह व फॅन्सी मॅट, गालिचा, ग्रास ग्रालिचा मॅटमध्ये व्हरायटी उपलब्ध आहे. गणेशमूर्ती सजावटीसाठी शेला, बाजूबंद, कानातील लटकन, मुकुट, उंदीर यामध्ये असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. लटकनमध्ये मोती लटकन, फॅन्सी लटकन असे प्रकार आहेत.मखरांमध्ये फ्लॉवर, सिंहासन, हिटलॉन मखर उपलब्ध आहेत. गीन ग्रास गालिचा ट्रेंडमध्ये असेल अशी व्यापाऱ्यांची अटकळ आहे. पडदे, झालर पडदे, कापडी, कमानी हे साहित्य जसे रेडीमेड स्वरूपात मिळते, तसेच मागणीनुसार हव्या तशा डिझाईनमध्ये तयारही करून दिले जाते..‘सोशल’वर काय होणार?(What will happen on Social?)आजकाल सोशल मीडियाने सर्वच मापदंड आणि दृष्टिकोन बदलले आहेत. बाजारपेठेचे स्वरूप बदलण्यातही सोशल मीडियाचा मोठा हातभार आहे. सोशल मीडिया ट्रेंड सेट करते, मग या ट्रेंडच्या तालावर बाकी सर्वजण ताल धरतात.सण-उत्सवही याला अपवाद नाहीत. यंदा गणेशोत्सवात ऐनवेळी सोशल मीडियावर काय ट्रेंडमध्ये येईल, यावरही बाजारपेठेचे गणित अवलंबून असते. इन्स्टाग्राम, फेसबुकवर कशा पद्धतीची सजावट ट्रेंडमध्ये येईल, यावर व्यापारी, भक्तगण नजर रोखून आहेत. जी गोष्ट ट्रेंडमध्ये येईल, ती कशी उपलब्ध करता येईल, यासाठी व्यापाऱ्यांनी आत्ताच प्लॅनिंग करून ठेवले आहे.सजावट साहित्याचे दर (रुपयांमध्ये)लड ६० ते ७० /-झेंडू लड ३० ते १५० /-फूल ४० ते २०० /-मॅट १०० ते ८०० /-वेल १२० ते ३०० /-हिटलॉन मखर ४०० ते २००० /-कमान ३०० ते १००० /-शेला ७०० ते ३००० /-मुकुट १००० ते ३००० /-बाजूबंद २५० ते ५०० /-सिंहासन ५०० ते १००० /-(तुषार माघाडे दै. सकाळच्या नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक आहेत.)---------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.