सुधीर फाकटकरकर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे निर्माण होणारा एक आजार आहे. कर्करोग म्हणजे मृत्यू हे कधीकाळापासून असणारे समीकरण आता विज्ञानामुळे बऱ्याच प्रमाणात बदलले आहे. अर्थातच यासाठी सहाय्यभूत ठरल्या आहेत संशोधन संस्था. .आपल्या देशातील ‘राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था’ (National Institute of Cancer Prevention and Research) ही त्यापैकीच एक. ‘पेशीविज्ञान संशोधन केंद्र’ म्हणून ही संस्था १९७९मध्ये स्थापन झाली. दहा वर्षांतच हे केंद्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत विस्तारत गेले आणि एकविसाव्या शतकात नवीन नावाने स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करू लागले. कर्करोगजन्य पेशीविज्ञान आणि प्रतिकारक्षमताशात्रात (इम्युनॉलॉजी) उपयोजित संशोधन करणे, या संशोधनाशी संबंधित माहितीचे भांडार (रिपॉझिटरी) निर्माण करणे, कर्करोगाच्या विशेष रुग्णांचा अभ्यास करणे, या विषयात प्रशिक्षण सुविधा निर्माण करणे आणि वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून घेणे असे उद्देश समोर ठेवून या संस्थेने वाटचाल सुरू ठेवली आहे. .संस्थेत सार्वजनिक आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंध, कर्करोगविषयक चिकित्सा, रेण्वीय जीवशास्त्र, संसर्गजन्य आजार विज्ञान, जैवसांख्यिकी, जैवमाहिती आणि पेशीविषयक चिकित्साशास्त्र असे मुख्य विभाग आहेत. यातील सार्वजनिक आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंध विभाग विविध प्रदेशातील जनसमूहांचा वयोगट, आहार, जीवनशैली अशा अनेक मुद्यांचा कर्करोगाच्या दृष्टिकोनातून माहिती घेत प्रतिबंधात्मक उपायांचा अभ्यास करत असतो. कर्करोगविषयक चिकित्सा विभाग रुग्णांची चिकित्सा आणि उपचारांबरोबरच दैनंदिन नोंदींपासून आजारातील विविध पायऱ्यांवरील बदलांचीही नोंद ठेवत असतो. रेण्वीय जीवशास्त्र विभाग कर्करोगाशी संबंधित जीवशास्त्रीय संशोधनास रेण्वीय पातळीवरील अभ्यास व निरीक्षणांद्वारे सहकार्य करत असतो. .संसर्गजन्य आजार विज्ञान विभाग लोकसमूहांचा अभ्यास करत कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या पर्यावरणीय घटकांवर संशोधन करत असतो. कर्करोगाशी संबंधित आकडेवारी आणि माहिती अद्ययावत तसेच जतन करण्याबरोबरच अन्य वैद्यकीय संस्थांशी आदानप्रदान करणे ही जैवसांख्यिकी आणि जैवमाहिती विभागांची जबाबदारी आहे. पेशीविषयक चिकित्साशास्त्र कर्करोगाशी संबंधित चिकित्सा-निदान-उपचारविषयक तंत्रविज्ञान विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असतो. हे सर्व विभाग अद्ययावत उपकरण प्रणालींनी सुसज्ज आहेत. याबरोबरच संस्थेत आणखी एक विशेष सुविधा आहे, ती म्हणजे ‘तंबाकू व्यसन विराम उपचार केंद्र’. तंबाखूचे सेवन कर्करोगासाठी कारणीभूत ठरत असल्याचे जगभरातील तज्ज्ञांनी केलेल्या शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे, म्हणूनच तंबाखूचे व्यसन थांबवण्यासाठी खास मार्गदर्शन व उपचार करणारी पद्धत विकसित करण्यात आली आहे. याखेरीज सुदृढ जीवनशैलीसाठीही मार्गदर्शन करणारे स्वतंत्र दालन येथे आहे. .संस्थेच्या संकेतस्थळावर कर्करोगासंबंधी विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यातील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून संकलित केलेल्या अहवालांमधील वस्तुनिष्ठ आकडेवारी पाहिली, तर या संस्थेच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते. संस्थेत कर्करोग आणि संबंधित विषयांमधील विविध अभ्यासक्रम राबवले जातात. हे अभ्यासक्रम वैद्यकीय तसेच जैवविज्ञानातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर एम. एस्सीच्या विद्यार्थ्यांना इथे संशोधन प्रकल्प करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यापुढेही विद्यार्थ्यांना संस्थेच कामाच्या विविध संधी मिळतात.राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था1-7, सेक्टर 39, नोएडा, जि. गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश 201301.संकेतस्थळः https://nicpr.org---------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.