महिलांचेच नाही तर पुरुषांचेदेखील हात टॅन होतातच. हाफ बाह्यांचा शर्ट किंवा ड्रेस घातला तर जास्त टॅन होते आणि संपूर्ण हातावर वेगवेगळ्या शेड दिसतात. फुल स्लीव्ह घातले तरी पंजा काळवंडतो आणि ते अजूनच विचित्र दिसते. बाहेर जाताना जसे चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे, तसेच हाताला आणि इतर एक्सपोज्ड त्वचेलाही लावावे. कॉटनचे हातमोजे वापरावेत.
माझा मुलगा १५ वर्षांचा आहे. सध्या उन्हामुळे त्याची त्वचा खूप टॅन झाली आहे. पिंपल व ब्रेकआउटही झाले आहेत. त्याची त्वचा कोरडी आहे. मानेवरही परिणाम जाणवतो आणि मान काळपट झाली आहे. कृपया उपाय असला तर सुचवावा.
किशोरवयीन मुलामुलींमध्ये पिंपल आणि ब्रेकआउट होणे कॉमन आहे. कारण या वयात हार्मोनल बदल घडत असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक पातळीवर बरेच परिवर्तन होत असते. ड्राय स्किन असूनही असे होऊ शकते. एकतर स्किनचा टाइप कॉम्बिनेशन असेल किंवा ती ऑईली असून डिहायड्रेट झालेली असेल.
डिहायड्रेट त्वचा म्हणजे ज्या त्वचेमध्ये ऑइल तर आहे, पण ओलसरपणा नाहीये. पाणी कमी प्यायल्याने असे होऊ शकते किंवा अजूनही बरीच वेगळी कारणे असू शकतात. त्यावर उपाय म्हणजे, ॲलो व्हेरा जेलमध्ये अर्धा चमचा मध, अर्धा चमचा प्रत्येकी नीम पावडर, मुलतानी माती आणि चंदन पावडर हे चांगले मिक्स करून घ्यावे.
१५ मिनिटे हा पॅक चेहऱ्याला आणि मानेला लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन त्वचेला ॲलो जेल अथवा हायड्रेटिंग मॉइस्चरायझर लावावे. असे आठवड्यातून तीन वेळा लावावे. ह्या पॅकमुळे टॅनही कमी होईल, शिवाय त्वचा हिल होईल.
चांगल्या क्वालिटीचा अँटी-बॅक्टेरिअल नीम फेस वॉश वापरावा. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऑईली, जंक फूड टाळावे. कार्बोनेटेड ड्रिंकऐवजी लिंबू सरबत किंवा ताक किंवा फ्रूट ज्यूस प्यावा. पाणी भरपूर प्यावे आणि बाहेर उन्हात जाताना स्कार्फ बांधून जावे.
व्यायाम नियमित करावा. वजन नियंत्रित असावे, कारण वजन जास्त असल्यासही मान काळपट होते. मान काळपट होण्याची अनेक कारणे आहेत, वजन जास्त असणे हे त्यापैकी एक.
हे उपाय करून बघा, नक्की फायदा होईल. पण पिंपल कमी होत नसतील, तर तज्ज्ञांना नक्की दाखवा.
उन्हाळ्यात वापरता येतील असे होममेड फेस पॅक कोणते आहेत, जे कोणालाही सहज वापरता येतील? कमीतकमी साहित्य असलेले सुचवावे, कारण मी हॉस्टेलला राहते. मला आणि माझ्या रूममेटना लावता येईल असा पॅक सुचवावा.
स्टुडंट आणि वर्किंग वुमन, ज्या हॉस्टेलला राहतात, त्यांच्यासाठी कमीतकमी साहित्य वापरून तयार केलेल्या फेस पॅक रेसिपी बऱ्याच आहेत. त्यात काही जनरल आहेत, ज्या सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होतात, तर काही ड्राय स्किन आणि काही पिंपल व ऑईली स्किनला सूट होतील अशा आहेत.
काकडीचा कीस करून त्यात घट्ट दही मिक्स करावे. पॅक तयार. हा फारच रिफ्रेशिंग, कुलिंग आणि टॅन रिमुव्हिंग पॅक आहे. १५ ते २० मिनिटे चेहरा, गळा, मान, हात, सगळीकडे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावा. त्वचा एकदम सॉफ्ट आणि स्मूथ जाणवेल. सगळ्या स्किन टाईपना सूट होणारा पॅक आहे; खूप छान आणि झटपट होणारा. नक्की करून बघा.
मुलतानी माती आणि काकडीचा गर मिक्स करून एक रिफ्रेशिंग आणि एक्सफोलिएटिंग पॅक तयार करता येतो. सगळ्या स्किन टाईपला सूट होणारा आहे. पण ड्राय स्किनसाठी थोडा मध घालून पॅक तयार करावा, म्हणजे त्वचा कोरडी जाणवणार नाही. मुलतानी माती स्किन क्लीन्सिंगचे काम करते.
मृत त्वचेचा लेअर निघून जातो, टॅन कमी होते. तर काकडी स्किन पोअरला टाइट करून त्वचा रिफ्रेश करते. १५ ते २० मिनिटे हा पॅक लावून ठेवावा, नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावे. ॲलो व्हेरायुक्त मॉइस्चरायझर लावावे. किंवा त्वचा ड्राय असेल, तर कोकोबटर युक्त मॉइस्चरायझर लावावे.
एक चमचा ॲलो व्हेरा जेलमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करावा. हा सुपर हायड्रेटिंग आणि कूलिंग फेस पॅक तयार होतो. २० ते २५ मिनिटे लावून ठेवावा. नंतर धुऊन घ्यावा. सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होईल असा मस्त पॅक तुम्ही रोज वापरू शकता.
ॲलो व्हेरा जेल चांगल्या कंपनीचे घ्यावे. अथवा कोरफड सहज मिळत असेल, तर गर काढून वापरू शकता. पण हॉस्टेलला ह्या गोष्टी सहज उपलब्ध नसतात, त्यामुळे मेडिकल स्टोअरमधून ॲलो व्हेरा जेल घेऊन यावे. मधही मेडिकल स्टोअर किंवा जनरल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असत.
एक टोमॅटो अर्धा कापावा आणि त्यावर कॉफी पावडर टाकावी. तो टोमॅटो कॉफी पावडरच्या बाजूने त्वचेवर गोल गोल स्क्रब करत लावावा. १५ मिनिटांनी धुऊन घ्यावे. त्वचा लगेच उजळून निघेल. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे त्वचा टोन होऊन फ्रेश फील होते. कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उत्तम एक्सफोलिएटिंग आणि टॅन रिमुव्हिंग इफेक्ट जाणवतो. हा पॅकदेखील सर्व स्किन टाइपना सूट होणारा असून उन्हाळ्यासाठी उत्तम पॅक आहे. सन बर्न झाले असल्यास, फक्त टोमॅटोची स्लाईस चोळावी किंवा टोमॅटोचा गर लावावा. लगेच आराम मिळेल.
कॉफी पावडर, ॲलो व्हेरा जेल, मध, थोडे रोझ वॉटर मिक्स करून पेस्ट तयार करावी. १५ मिनिटे लावून नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावे. त्वचा एकदम टवटवीत आणि फ्रेश जाणवेल. कॉफीमध्ये अँटी-एजिंग गुण आहेत, तर मध, ॲलो व्हेरा आणि रोझ वॉटर हे त्वचेला हायड्रेट करून तजेलदार करते. टॅन कमी करून सन बर्न हिल होण्यास मदत होते.
वरील सर्व फेस पॅक चेहऱ्यालाच नव्हे, तर बॉडी पॅक म्हणूनही लावू शकता. हे सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होणारे पॅक असून, त्यासाठी लागणारे साहित्य सहज मेडिकल स्टोअर अथवा सुपर मार्केटमध्ये किंवा ऑनलाइनही उपलब्ध असते.
माझे हात खूप जास्त टॅन झाले आहेत. माझा मार्केटिंग जॉब आहे. फुल बाह्यांचा शर्ट घालतो, पण तरीही टॅन झालेच आहे. त्यातही पंजा आणि बोटे तर फारच वेगळे दिसतात. काय करावे?
महिलांचेच नाही तर पुरुषांचेदेखील हात टॅन होतातच. हाफ बाह्यांचा शर्ट किंवा ड्रेस घातला तर जास्त टॅन होते आणि संपूर्ण हातावर वेगवेगळ्या शेड दिसतात. फुल स्लीव्ह घातले तरी पंजा काळवंडतो आणि ते अजूनच विचित्र दिसते. बाहेर जाताना जसे चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे, तसेच हाताला आणि इतर एक्सपोज्ड त्वचेलाही लावावे. कॉटनचे हातमोजे वापरावेत.
शक्य असल्यास पार्लरला जाऊन रेग्युलर मॅनिक्युअर अथवा हँड पॉलिश करावे. ह्यासोबतच होम केअरमध्ये आठवड्यातून एकदा अँटी टॅन पॅक लावावा. मसूर डाळ पीठ आणि दही मिक्स करून हा पॅक टॅन झालेल्या त्वचेला १५ ते २० मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन त्वचा हायड्रेट करावी. थोडा वेळ लागेल, पण नियमितपणे हे उपाय केल्यास नक्की फायदा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.