सागर गिरमेकार बऱ्याचदा आपल्या घरासारखीच असते. अनेकांचे तर दिवसाचे कित्येक तास कारप्रवासात जातात. त्यामुळे ती स्वच्छ, आरामदायी असणे आवश्यकच असते, अन्यथा उंदीर नावाचा राक्षस कारवर हल्ला करून आपले मोठे नुकसान करू शकतो..कोकणात फिरायला जायचं म्हणून मित्रानी त्याची गाडी तीन-चार दिवस आधीच तयार करून ठेवली. निघायचा दिवस आला. सगळ्या मित्रांनी पहाटे बॅगा घेऊन निघायची तयारी केली. गाडीत बसून चावी लावली तर डॅश बोर्डवर लाइटच दिसत नव्हते. पुन्हा पुन्हा चेक केले तरीही तशीच परिस्थिती होती. उतरून बॅटरी चेक केली तर बॅटरीही चार्ज होती. पण तरीही गाडी सुरू होत नव्हती. नेमक्या वेळी गाडीने असा दगा दिला म्हणून सर्वांनाच वाईट वाटलं. ट्रीप कॅन्सल करावी लागली.मेकॅनिकने गाडी तपासली, तेव्हा लक्षात आले, की हा दगा गाडीने नाही तर उंदरांनी दिला होता. होय तुम्ही बरोबर वाचलंत. आपल्या पार्किंगमध्ये उभ्या असणारे वाहन उंदीर कधीही नादुरुस्त करू शकतात आणि मग ते दुरुस्त करण्यासाठी खिशाला किमान ५० ते ६० हजार रुपयांची फोडणी बसू शकते. त्यातही लक्झरी कार असेल तर तो कित्येक पटीने वाढू शकतो.नेमकं काय होतं?इंजिन तुलनेने उबदार असल्याने आश्रयाच्या शोधात उंदीर पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीमध्ये घुसतात. बॉनेटच्या खालील इंजिन बेमध्ये प्रवेश केल्यावर सवयीने उंदीर आतील वायरिंग, इन्सुलेशन कुरतडायला सुरवात करतात. वायरीच्या वर असलेले आवरण मऊ असल्याने उंदीर त्याकडे आकर्षित होतात. यामुळे कारमधील इलेक्ट्रिकल सिस्टीमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वायरी कुरतडल्याने सर्किट पूर्ण होऊ शकत नसल्याने इंजिन सुरू होऊ शकत नाही. त्यासोबतच ब्रेक आणि एअर बॅग सिस्टिमही काम करू शकत नाही. पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांमध्ये केवळ उंदरांचाच नाही, तर ढेकूण आणि तत्सम किटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे गाडीचा आरामदायीपणा कमी होऊन ती त्रासदायक होऊ शकते. .कारणे काय?कार जागेवर उभी असणे : पार्किंगमध्ये किंवा मोकळ्या मैदानात अनेक दिवस कार न हलवता उभी असल्याने उंदीर किंवा इतर कीटक आश्रयस्थान म्हणून कारचा वापर करण्यास सुरुवात करतात. विशेषतः पावसाळी वातावरणात उंदीर, घुशी बंद कारमध्ये आश्रय घेतात आणि कारचे वायरिंग कुरतडून नुकसान करतात.दमट वातावरणाचे आकर्षण : कारच्या काचा अनेक दिवस बंद असल्याने दमट वातावरण तयार होते. कारमध्ये कचरा, अन्नपदार्थ पडलेले असतील किंवा अस्वच्छता असेल तर खाण्याच्या शोधात असणाऱ्या उंदरांचा आणि ढेकणांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होतो.सोया मटेरिअल : कारच्या वायरिंगमध्ये सोयाचा (सोयाबीन तेल) वापर करून इन्सुलेशन तयार केलेले असते. त्याकडे उंदीर अधिक आकर्षित होतात.उंदरांचे लक्ष्यइंजिन कंपार्टमेंट वायर्स: चावीने इग्निशन दिल्यापासूनइंजिन सुरू करण्यासाठीचे सर्किट पूर्ण करणारी महत्त्वाची वायर, त्यासोबतच एअर कंडिशन आणि विविध सेन्सर्सला कनेक्ट करणाऱ्या वायर्सही उंदीर कुरतडू शकतात. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते.केबिन वायर्स : कारमधील बटन ऑपरेटेड सीट लाइट, अन्य दिवे, स्क्रीन, एंटरटेनमेंट सिस्टमशी कनेक्ट असलेल्या वायर्सही या हल्ल्याला बळी पडतात.इन्सुलेशन सामग्री : कारमधील वायरसाठी वापरण्यात आलेले इन्सुलेशन सोयाच्या वासामुळे उंदीर वायरी चघळत किंवा चावत असल्याने इलेक्ट्रिक सिस्टीम बंद पडते. अशा प्रकारे झालेले नुकसान शोधणे अवघड जाते.वायर कुरतडलेली ओळखायची कशी?इलेक्ट्रिक बिघाड : बऱ्याचदा कार सुरू होते, मात्र एसी व्यवस्थित काम न करणे, केबिन लाइट न लागणे किंवा चालू-बंद होणे यासारख्या गोष्टी घडू लागल्यास गाडीचे वायरिंग कुरतडलेले आहे, असे समजावे.जाळल्याचा वास : कार सुरू केल्यानंतर एसीमधून किंवा व्हेंटमधून वायर जळाल्याचा वास येऊ लागल्यास वायर कुरतडलेली असण्याची शक्यता असते.पायांचे ठसे : कारचे बॉनेट उघडल्यावर इंजिन बेवर किंवा बॅटरीवर साचलेल्या धुळीत उंदराच्या पायांचे ठसे दिसल्यास उंदराने वायरिंगला नुकसान पोचवले आहे, हे ओळखावे. .उपायउंदीर, घुशींमुळे किंवा अन्य कीटकांमुळे नुकसान होऊ नये यासाठी बाजारात आता अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. त्याचा वेळोवेळी वापर केल्यास मोठे नुकसान टळू शकते.अल्ट्रासॉनिक रिपेलेंट्स : हे रिपेलेंट उच्च-वारंवारतेच्या ध्वनिलहरी बाहेर सोडत असतात. त्याचा उंदीर, घुशी आणि कीटकांना त्रास होतो. या लहरींचा आवाज त्यांना सहन होत नसल्याने हे रिपेलेंट लावलेल्या ठिकाणी त्यांचा वावर राहात नाही. कारमध्ये हे रिपेलेंट लावणे अत्यंत सोपे असून प्लग अँड प्ले स्वरूपात ते काम करते.रिपेलेंट टेप : ही टेप किंवा चिकटपट्टी उंदरांना प्रतिबंध करणाऱ्या रसायनांपासून तयार करण्यात आलेली असते. कारमधील सहज दिसणाऱ्या किंवा उंदीर सहज प्रवेश करू शकतील अशा वायर आणि होजेसला ही चिकटपट्टी लावल्यास उंदीर किंवा घुशींपासून बचाव करता येऊ शकतो. फक्त वाहनामध्ये अशा प्रकारे सर्व ठिकाणी चिकटपट्टी लावणे जिकरीचे ठरते, शिवाय ती वेळोवेळी बदलावीही लागते.कव्हर किंवा जाळीचा वापर : बॉनेटच्या खाली इंजिन बेवर एखादे कडक कव्हर अथवा कारच्या खालील बाजूने जाळी बसविल्यास उंदरांना अटकाव होऊ शकतो. हे कव्हर किंवा जाळी हेवी ड्यूटी प्लास्टिक अथवा स्टेनलेस स्टीलचे असतात, त्यामुळे ते कोणत्याही वातावरणात टिकू शकतात.अन्य घरगुती उपाय : कारपासून उंदरांना दूर ठेवण्यासाठी तंबाखूचा वापर हा प्रभावी उपाय असल्याचे समोर आले आहे. तंबाखूचा विशिष्ट वास उंदरांना प्रतिबंध करतो. मात्र तंबाखू गाडीत किंवा इंजिन बेमध्ये ठेवणे अस्वच्छ वाटू शकते.पेपरमिंटच्या तेलाची पाण्यासोबत फवारणी केल्यास त्याच्या तीव्र वासानेही उंदरांचा प्रतिबंध होऊ शकतो.--------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.