अॅड. सायली गानू- दाबके
मला चित्रकलेची आवड आहे आणि पेंटिग जमविण्याचा छंद आहे. माझ्या संग्रहात अनेक नामवंत भारतीय आणि काही परदेशी चित्रकारांची मी स्वतः विकत घेतलेली ओरिजिनल पेंटिग आहेत.
आजच्या चित्र-बाजाराचा विचार करता या संग्रहाचे बाजारमूल्य खूप मोठे आहे. माझ्या परिवारात याबद्दल समज व आवड असणाऱ्या बाकी व्यक्ती नाहीत. तर मला ही पेंटिग विल करून परिवाराबाहेरील व्यक्तींना देता येतील का? यात माझे वारसांचे आर्थिक नुकसान होत नाही ना?