अनुराग ठाकूरनव्या भारताच्या नव्या रूपाला कोणतेही पाठबळ मिळणे अशक्य नाही. आता आपले खेळाडू केवळ खेळण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी सहभागी होतात. भारतीय संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज झाला आहे, बाजी मारूच असा आत्मविश्वास खेळाडूंना आहे. .भारताने नुकताच टी-२० विश्वकरंडक जिंकला, त्यामुळे देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. क्रिकेट नेहमीच आपल्या भारतीय क्रीडाविश्वाच्या केंद्रस्थानी राहिले आहे, पण अलीकडच्या काळात हे क्षितिज विस्तारत आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धांमधील विविध क्रीडाप्रकारांमध्ये एक विशिष्ट उंची गाठली आहे, असे आकडेवारीनुसार सिद्ध होते. अर्थातच हा बदल एका रात्रीत झालेला नाही. यासाठी २०१४ ते २०२२ या काळातील आशियाई क्रीडास्पर्धेचे निकाल अभ्यासावे लागतील.सन २०१४मध्ये झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने ५७ पदके तर जिंकलीच, पण जवळपास १६ वर्षांनंतर पुरुष हॉकीमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले, आणि २०१६च्या ऑलिंपिक पात्रता यादीमध्ये थेट प्रवेश मिळवला. २०१८मध्ये, भारतीय खेळाडूंनी हा आकडा ७० पदकांपर्यंत नेला आणि सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या देशांच्या यादीत २०१४मध्ये मिळवलेली आठवी जागा २०१८मध्येही राखली. २०२२मध्ये भारताने २०१८च्या तुलनेत ३७ पदके जास्त जिंकून एकूण १०७ पदके मिळवण्याचा विक्रम केला. यामुळे भारताने केवळ आठ वर्षांत आठव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर उडी मारली. याशिवाय, आपण २०२०मधील टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत ७ पदके मिळवून आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये एक सुवर्णपदक, दोन रौप्यपदके आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. ह्या आकडेवारीतून दिसणारी यशकथा टीकाकारदेखील अमान्य करू शकत नाहीत. पण हा एवढा मोठा बदल झाला कसा?खेळाडू अनेकदा म्हणतात, की अद्ययावत सुविधा, आर्थिक पाठबळ आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करणारी सक्षम प्रणाली यांमुळे त्यांच्या कामगिरीत प्रचंड सुधारणा होत असते. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०१४नंतर अनेक योजना राबवल्या गेल्या. याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या देशाचे परिवर्तन करण्यात क्रीडाविश्व मोठा हातभार लावू शकते, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे. ‘खेलो इंडिया’चे ‘खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया’ हे घोषवाक्य त्यांचा हाच दृष्टिकोन दर्शवते. खेळ देशातील तरुणांना शिस्तबद्ध, निरोगी आणि केंद्रित जीवनशैली देऊ शकतात आणि याचा परिणाम भारताला जागतिक क्रीडा-नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी चॅम्पियन्स विकसित करण्यात होऊ शकतो, असे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळेच विविध क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळांचा प्रचार-प्रसार करण्याची त्यांची प्रक्रिया ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून सुरू आहे. २०१०मध्ये सुरू झालेल्या ‘खेल महाकुंभ’मुळे गुजरात राज्यात क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन मिळाले. २०१०मध्ये या स्पर्धेत १३ लाख खेळाडू सहभागी होते. २०२४मध्ये यात ५५ लाखांपर्यंत वाढ झाली. ‘खेल महाकुंभ’ राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आता संपूर्ण देशात खेल महाकुंभांचे आयोजन करण्यात येते. .सन २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारतीय क्रीडाविश्वाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. अपुऱ्या पायाभूत सुविधा, मर्यादित निधी, प्रशासकीय अडथळे, तळागाळातील खेळाडूंच्या विकासासाठी उपक्रमांचा अभाव अशी अनेक आव्हाने होती. मात्र, पंतप्रधानांनी उच्च आणि तळागाळातील दोन्ही पद्धतीच्या खेळाडूंना उपयोग होईल अशा अनेक योजना सुरू केल्या. २०१५ आणि २०१८मध्ये सुरू झालेल्या ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’ (TOPS/ टॉप्स) आणि ‘खेलो इंडिया’ हे उपक्रम ‘गेम चेंजर’ ठरले.टॉप्सद्वारा सरकार उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक स्तरावर पाठबळ देते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासाठी जगभरातील सर्वोत्तम प्रशिक्षक, विशेष उपकरणे आणि इतर आवश्यक सुविधांसाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच प्रत्येक खेळाडूला दर महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत भत्ता दिला जातो. ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत २,५००पेक्षा जास्त खेळाडूंना हे पाठबळ मिळते. यासाठी सरकार दरवर्षी प्रति खेळाडू ६.२८ लाख रुपयांपर्यंतची रक्कम खर्च करते. त्यांना दरमहा ₹ १० हजार स्टायपेंडदेखील देते.‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’साठी अपात्र ठरणाऱ्या, पण ‘खेलो इंडिया’साठी आवश्यक असलेल्या स्कीलसेटपेक्षा काही अंशी अधिक पात्रता असणाऱ्या खेळाडूंसाठी ‘टॉप्स डेव्हलपमेंट ग्रुप’ची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी मध्यम स्कीलसेट असणारे खेळाडू पात्र ठरतात.महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी २०२१मध्ये ‘खेलो इंडिया महिला लीग’ सुरू करण्यात आली होती. यामध्ये आजवर २०हून अधिक क्रीडाप्रकारांमध्ये जवळपास ८.३३ लाखांपेक्षा जास्त महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत. शालेय पातळीवरील कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू होण्यासाठी आवश्यक असणारा स्कीलसेट आहे हे हेरण्यासाठी २०२४च्या सुरुवातीला खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट इनिशिएटिव्ह (केआयआरटीआय -किर्ति) हा उपक्रम सुरू झाला. .सन २०१४पासून क्रीडा विभागाचे बजेट ३०० टक्क्यांनी वाढले आहे. ते ८०० कोटी रुपयांवरून २,५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याचा थेट परिणाम खेळाडूंना विविध योजनांद्वारे वित्तीय पाठबळ मिळण्यावर झाला आहे. यामागे पंतप्रधानांचा ‘योग्य वेळी योग्य पाठिंबा मिळाल्यामुळे परिस्थितीत बदल आणि परिणामी यश प्राप्त होते’ हा विचार आहे. आम्ही खेळाडूंच्या यशासाठी एखाद्या समस्येवर तत्काळ उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक प्रसंग मला आठवतात. कोविड महासाथीच्या कठीण काळात जेव्हा नेमबाजांना अद्ययावत शूटिंग रेंजमध्ये सराव करणे कठीण जात होते, तेव्हा सरकारने त्यांना त्यांच्या स्थानिक शूटिंग रेंजमध्ये सराव करता यावा यासाठी आवश्यक दारूगोळा आणि इतर सामग्री उपलब्ध करून दिली. नीरज चोप्रासाठी डॉ. क्लाउस, चिराग शेट्टीसाठी मॅथियस बो सतविक किंवा पी.व्ही. सिंधूसाठी अगस द्वी सान्तोसो अशा जागतिक कीर्तीच्या वैयक्तिक प्रशिक्षकांची नियुक्ती केली. खेळाडूंना आवश्यक असलेल्या आर्थिक आणि वैयक्तिक साधन-सामग्रीचा पुरवठा केला.खुद्द पंतप्रधानांनीच क्रीडाक्षेत्राच्या वृद्धीकडे आणि खेळाडूंच्या फायद्याकडे लक्ष दिल्यामुळे हळूहळू व्यवस्थेच्या मानसिकतेतही बदल होत आहे. हे नव्या भारताचे नवे रूप आहे. इथे कोणतेही पाठबळ मिळणे अशक्य नाही. आता आपले खेळाडू केवळ खेळण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी सहभागी होतात. भारतीय संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज झाला आहे, खेळाडूंना बाजी मारू असा विश्वास आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी विविध योजनांमार्फत खेळाडूंना ४५० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत केली आहे. खर्च केलेल्या पैशांमुळे त्यांना आवश्यक साधने मिळाली आहेतच, परंतु मला खात्री आहे, की त्यांच्याकडे कष्टांचे रुपांतर मेडलमध्ये करण्याचे मानसिक, शारीरिक सामर्थ्य आणि अगणित कौशल्यदेखील आहे. मला खात्री आहे, की यावेळी पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतासाठी चांगले रिझल्ट लागतील.(अनुराग ठाकूर माजी केंद्रिय क्रीडा आणि युवककल्याण मंत्री आहेत.)--------------------.विश्वाचे आर्त: यंत्र आणि मानव यांच्यात काही एक बदल करून वेगळेच अस्तित्व सिद्ध होण्याचे दिवस दूर नाहीत.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.