परीक्षा म्हटली की अतिशय तणावपूर्ण वातावरण, वर्षभर केलेला अभ्यास वेळेवर आठवेल की नाही अशी सतत वाटणारी धास्ती असं वातावरण डोळ्यासमोर येतं. पण, पुस्तकात बघून पेपर लिहा, असं विद्यार्थ्यांना कोणी सांगितलं तर?? आश्चर्य वाटेल ना? आनंदही होईल! हुश्श सुटलो बुवाऽऽ असंही मनात येईल? मग जऽऽरा थांबा... वरकरणी ही पद्धत अत्यंत सोपी वाटत असली, तरीही अशी ‘ओपन बुक’ परीक्षा पद्धती तेवढी सोपी नाही बरं!