विश्‍वाचे आर्त । अमेरिका कोणाच्या मुळावर?

Human Philosophy : अमेरिकेला एका अर्थाने युरोपचे, त्यातही इंग्लंडचे ‘एक्स्टेन्शन काउंटर’ म्हणायला हरकत नसावी.
world philosophy
world philosophy esakal
Updated on

डॉ. सदानंद मोरे

उपभोगाची साधने जेव्हा अधिक सक्षम होतात, त्यांची संख्या वाढून ती सर्वांना सहजासहजी उपलब्ध होऊ लागतात आणि त्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे अशा उपभोगाच्या नवनव्या संकल्पना व तऱ्हा प्रचलित होऊ लागतात, तेव्हा निसर्गाच्या उपभोगाचा पुनर्विचार करायची गरज निर्माण होते.

महाराष्ट्रातील संत मानवासह चराचर सृष्टीकडे कसे पाहत होते याची चर्चा आपण केली. त्यांच्या आणि भारतीय दर्शनांपैकी अनेकांच्या मते ही सर्व सृष्टी एकाच चैतन्यतत्त्वाचा आविष्कार असल्यामुळे तिचे सर्व घटक एकमेकांशी संबद्ध व निगडित आहेत. या चैतन्यतत्त्वालाच उपनिषदांनी ब्रह्म असे नाव दिले.

सजीवांमध्ये या तत्त्वाचा आविष्कार सहजपणे प्रत्ययास येतो. अर्थात, सर्वच सजीवांना त्याचे भान असते असे नाही. मानवात ते प्रकर्षाने असल्यामुळे त्याला याचा उलगडा होऊ शकतो. याच तत्त्वाचे निर्जीव सृष्टीतील अस्तित्व सहजासहजी लक्षात येणे अशक्यच म्हणावे लागेल. त्यासाठी साक्षात्कार नावाच्या गूढ अनुभूतीची गरज असते, जी सर्वांच्याच आवाक्यातील बाब नव्हे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.