पृथा वीर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हस्तकलेचा पिढीजात वारसा मिळाला आहे. प्रतिष्ठान ते पैठण या पुस्तकात डॉ. रा. श्री. मोरवंचीकर लिहितात, की बदामीच्या चालुक्य कालखंडात पैठण येथील वस्त्रोद्योग कळसास पोहोचला होता.
हस्तकलेला राजाश्रय मिळाल्याने या मातीत पैठणी, हिमरू व बिदरी कला बहरली. आजही इथले कारागीर, विणकर हा वारसा जोपासून आहेत. मात्र उत्पन्नात सातत्य नसणे आणि या बहुमोल वारशाला हवा तसा लोकाश्रय न मिळाल्याने पुढच्या पिढीतील विणकर आणि कारागीर या कलाक्षेत्रात येण्यासाठी आतुर नसतात.