पृथा वीर
शतकी आयुष्य असणारी पैठणी म्हणजे सौंदर्य आणि प्रतिष्ठेची एक खूण. पैठणच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाच्या पाऊलखुणा ठळकपणे दिसतात. आज गतकाळाचं वैभव ओसरलं असलं, तरीही त्याकाळचा वारसा सांगणारी पैठणी त्या वैभवशाली इतिहासाची आठवण आहे.
‘धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन...
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली...’