डॉ. मिहीर हजरनवीस
पंचकर्म केवळ आजारी व्यक्तीने नाही, तर निरोगी व्यक्तींनीही करावे. सामान्यतः वसंत ऋतूत (मार्च-एप्रिल महिन्यात) कफ कमी करण्यासाठी वमन केले जाते. वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वर्षा ऋतूमध्ये (जून-जुलै महिन्यात) बस्ति ही उपचारप्रक्रिया करतात. पित्त व रक्ताच्या शुद्धीसाठी शरद ऋतूत (सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात) विरेचन व रक्तमोक्षण करतात. नस्य वर्षभरात कधीही करता येते.