Parenting : पाल्यांसाठी पालकांचा संकल्प

पालक-मुलांमधल्या नात्यांवर सकारात्मक परिणाम होईल हे निश्चित! शेवटी मुलं पालकांकडे पाहूनच शिकतात.
parenting
parentingsakal
Updated on

डॉ. वैशाली देशमुख

नवीन वर्षात किशोरवयीन मुलांचे पालक म्हणून खालील आघाड्यांवर अशा काही गोष्टी ठरवता येतील का? दिसताना कदाचित त्यातले काही निश्चय स्वार्थीपणाचे वाटतील, पण त्यांचा पालक-मुलांमधल्या नात्यांवर सकारात्मक परिणाम होईल हे निश्चित! शेवटी मुलं पालकांकडे पाहूनच शिकतात.

वेळ: मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी वेळ काढूया. कुठल्याही कामासाठी म्हणून नव्हे, सहजच. पण कधी?

  • मुलांना शाळेला, क्लासला वगैरे सोडताना

  • रात्री झोपताना

  • एकत्र मिळून काहीतरी काम करताना

  • निवांत लोळताना

  • एकत्र भाजी, सामान आणायला जाताना

parenting
Parenting Tips : मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी मुलांना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी

गप्पा: मुलांबरोबर गप्पा ‘शुरू होते ही खतम’ होतात का? मग -

  • बोलायची घाई न करता शांतपणे नीट ऐकून घेऊया.

  • हे टाळूया- सूचना, सल्ले, अतिप्रश्न, तीव्र प्रतिक्रिया

  • संधी मिळाली म्हणून उपदेश सुरू करण्याच्या ऊर्मीपासून स्वतःला रोखूया.

व्यायाम:

  • आपण स्वतः ठरवून आठवड्यातून निदान तीन ते चार दिवस काहीतरी व्यायाम करूया.

  • शनिवार-रविवारी टेकडी चढायला, पळायला किंवा निसर्गात फिरायला जाऊया; शक्यतो मुलांना बरोबर घेऊन. एकमेकांबरोबर वेळ घालवून ताजेतवाने होण्याचीही ही एक संधी असेल.

व्यवसाय/नोकरी: असं ठरवूया की-

  • माझं काम मी आनंदानं करेन. फक्त पैसे मिळवण्यासाठी, कंटाळून, वैतागून, मारून मुटकून करणार नाही.

  • कामाच्या जागचे ताणतणाव घरी न आणता तिथेच ठेवून येईन.

मनोरंजन: आपल्या मनोरंजनाच्या कल्पना अशा आहेत का?

  • खूप खर्च करणे

  • कायम महागड्या ठिकाणी ट्रिपला जाणे

  • मद्यपान, ड्रग्ज घेणे

  • इतरांना त्रास होईल असा धांगडधिंगा करणे.

  • मुलं त्यावरूनच त्यांच्या कल्पना ठरवणार आहेत. यावर विचार करूया.

  • मोबाईल फोन: मुलांवर ओरडण्याआधी हे आपण पाळतो का?

  • मोबाईलमुक्त जागा

  • (जेवणाचं टेबल, टॉयलेट, पलंग इ.)

  • मोबाईलमुक्त वेळा (सगळे एकत्र गप्पा मारत असताना, झोपण्याच्या आधी, गाडी चालवत असताना इ.)

parenting
Education Loan घेताना गोंधळ उडतोय? मग ‘हा’ आहे शैक्षणिक कर्ज घेण्याचा सोपा उपाय

सामाजिक वर्तन: हे करून पाहूया-

  • माझ्याकडची कामाची मावशी आली नाही तर तिच्यावर न ओरडता मी कारण विचारेन. कधीकधी कारण नसताना सुट्टी घेण्याचा तिचा हक्क मी मान्य करेन.

  • भाजी, फळं घेताना घासाघीस करणार नाही.

  • ट्रॅफिक सिग्नलसारखे सामाजिक नियम सातत्यानं आणि मनापासून पाळेन.

झोप:

  • आपला दिवस साधारण सूर्याच्या दिवसाशी सुसंगत आहे ना? आपण कारण नसताना जागरण करतो का? विनाकारण सकाळी उशिरापर्यंत लोळत पडतो का? किमान सात ते आठ तास झोप घेतो का? नसेल तर आता सुरुवात करूया.

रागाचं नियोजन: राग आला की तुम्ही तो आरडाओरड, फेकाफेकी, शिव्या देणे, मारामारी करणे, इतरांना दुखावणे असा हाताळता का? त्याऐवजी तो असा हाताळता येईल का?

  • आपल्याला काय वाटतं हे शांतपणे सांगणे.

  • रागात असताना गप्प बसणे.

  • राग व्यक्त करण्याच्या योग्य पद्धतींवर विचार करणे.

आहार:

  • जेवणाच्या टेबलावर भरपूर भाज्या, कोशिंबिरी ठेवूया.

  • घरात नेहमी फळांचा साठा असू द्या.

  • बिस्किटं, फरसाण यांचे साठे घरात नकोत. एखाद्या वेळी लागतील तसे छोटे पुडे आणूयात.

  • सकाळी घरातून निघताना सगळे नाश्ता करूनच निघतील अशी कौटुंबिक प्रथा सुरू करूया.

---------------------

parenting
Parenting Tips : मुलाने एखादी गोष्ट गिळली तर सर्वात आधी शांत व्हा आणि या गोष्टी करा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.