पॅरिस ऑलिंपिक पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर मीराबाईसाठी पुढील काही महिने महत्त्वाचे आहेत. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या इतर देशांतील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा अधिक वरचढ ठरण्यासाठी तिला मेहनत घ्यावीच लागेल. सारे नियोजन व्यवस्थित जुळून आल्यास पॅरिसमध्ये भारताची ही अनुभवी वेटलिफ्टर देशासाठी आणखी एक ऑलिंपिक पदक जिंकू शकेल.