सोनिया उपासनीफॅशन जगतात कपडे, दागिने, पर्स, फूटवेअर, हेअर ॲक्सेसरी, फर्निशिंग अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये मोत्यांचा वापर करून सुंदर कलाकृती तयार केल्या जातात. रिअल पर्लपासून कल्चर्ड आणि सेमी कल्चर्ड पर्लपर्यंत पाहिजे त्या प्रकारात मोती उपलब्ध आहेत..ज्या रत्नाला त्याचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी पैलू पाडण्याची अथवा पॉलिशची आवश्यकता नसते, असे रत्न म्हणजे मोती. मोत्यांना त्यांच्या सौंदर्यामुळे आणि ते दुर्मीळ असल्यामुळे शतकानुशतकांपासून महत्त्व आहे. मोती इतर रत्नांपेक्षा मऊ असला, तरी त्याचे सौंदर्यही तितकेच कमाल! असे हे इतके सुंदर रत्न दागिन्यांव्यतिरिक्त इतर फॅशन ट्रेंड्समध्येसुद्धा वापरले जाते. उदाहरणच द्यायचे झाले, तर मोत्यांची एम्ब्रॉयडरी असलेल्या ड्रेसवर साजेल अशी मोत्यांची ज्वेलरी एक वेगळा सुरेख लुक प्रदान करते.पूर्वीच्या काळी मोती सुसंस्कृतपणाचे प्रतीक म्हणून फक्त औपचारिक प्रसंगीच परिधान केले जात असत. आजच्या युगात ह्या रत्नाने सहजपणे रोजच्या पोशाखांमध्येही आपले स्थान शोधले आहे. मोत्यांची नैसर्गिक चमक आणि ‘क्लास’ यामुळे अनौपचारिक आणि औपचारिक अशा दोन्ही प्रसंगांसाठी मोती परिधान करता येतो. aभारतीय तसेच जागतिक पातळीवरील अनेक फॅशन डिझायनर्स मोती वापरून आउटफिट्स तयार करतात. ड्रेस कॅज्युअल असो, फॉर्मल असो वा फेस्टिव्ह; मोतीजडीत पेहराव अथवा मोत्यांच्या ॲक्सेसरी वापरल्याने एकूणच पेहरावाचा दर्जा नेहमीच उंचावतो.फॅशन जगतात कपडे, दागिने, पर्स, फूटवेअर, हेअर ॲक्सेसरी, फर्निशिंग अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये मोत्यांचा वापर करून सुंदर कलाकृती तयार केल्या जातात. रिअल पर्लपासून कल्चर्ड आणि सेमी कल्चर्ड पर्लपर्यंत पाहिजे त्या प्रकारात मोती उपलब्ध आहेत. रोजच्या वापरासाठी कापडावर कलाकुसर करायला हाय ग्रेड प्लॅस्टिक आणि फायबरपासून कृत्रिम मोती तयार केले जातात. हे मोती विविध रंग आणि शेड्समध्ये कापडाच्या मॅचिंगसाठी अथवा कॉन्ट्रास्टमध्ये उपलब्ध असतात. कलर्ड कल्चर्ड पर्ल ज्वेलरी तर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे..मोती आणि फॅशनकपड्यांमध्ये इंडियन वेअर आणि इंडोवेस्टर्न वेअरमध्ये फेस्टिव्ह आणि वेडिंग सीझनसाठी मोतीजडीत पोशाख तयार केले जातात. पुरुष असोत वा स्त्रिया, वृद्ध असोत वा लहान मुले, सर्वांसाठी विविधरंगी पोशाख उपलब्ध असतात. ब्राइट रेड, ऑरेंज अथवा मॅजेंटा लेहेंग्याला सुरेख मोती एम्ब्रॉयडरी केली, तर त्या पोशाखाचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढते. डार्क टोनबरोबरच लाइट टोनच्या कापडांवरही मोती तेवढाच उठून दिसतो.प्लेन प्युअर सिल्कच्या साडीवर मोतीजडीत ब्लाऊज घालण्याची फॅशन पूर्वीच्या राण्या-महाराण्यांची. पण हाच ट्रेंड परत आला आहे. डिसेंट रॉयल लुकसाठी स्त्रिया मोती व कुंदनजडीत ब्लाऊजबरोबर प्लेन सिल्क साडी नेसणे पसंत करतात. वेस्टर्न लुकमध्ये जिन्सच्या फ्रंट पॉकेट रीमवर मोत्यांची एम्ब्रॉयडरी एक आगळावेगळा लुक देते. त्यावर जर मोतीजडीत क्रोशियाचा टॉप घातला तर लुक अजून उठून दिसतो. पुरुषांच्या जॅकेटवर एका बाजूला मोत्यांचा पॅच सुंदर लुक देतो.शर्ट अथवा शेरवानीला मोत्यांची बटणे एकदम रॉयल लुक आणतात.लग्नाच्या पोशाखामध्ये तर नवऱ्या मुलासाठी विविध रंग आणि पॅटर्नमध्ये मोतीजडीत कुर्ते उपलब्ध आहेत. ज्वेलरीमध्ये पर्ल स्टड इअरिंग्ज वेस्टर्न ड्रेसवर खुलून दिसतात. सुंदरशा लिनन साडीवर गळ्यात एक पर्ल स्ट्रिंग घातली तर एकदम खास लुक मिळेल. त्यावर जर हातात घालायला मोत्यांचे ब्रेसलेट असेल, तर ‘मोतियों’ पे सुहागा! आपल्या पारंपरिक दागिन्यांमधले मोत्यांचा तन्मणी, चिंचपेटी, राणीहार, मोत्यांची ठुशी, तोडे, कानातील झुबे, कंबरपट्टा हे दागिने कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाहीत. पारंपरिक पोशाखांवर मोत्यांचे दागिने अप्रतिम दिसतात. उदाहरणार्थ, नऊवारी नेसून केसांच्या खोप्यावर माळलेला मोत्यांचा आकडा. हल्लीच्या तरुणी पैंजणसुद्धा मोतीजडीत पसंत करतात. फूटवेअर आणि हँडबॅगमध्येदेखील मोत्यांचा वापर करून सुंदर पीस तयार होतात. घराच्या दारावरील तोरण, खिडक्यांचे पडदे यांवरसुद्धा कृत्रिम मोत्यांचा वापर केला जातो..हे लक्षात ठेवामोत्यांपासून तयार केलेले दागिने आणि मोतीजडीत कपड्यांची नीट काळजी घेतली, तर ह्या वस्तू वर्षानुवर्षे छान टिकून राहतील. मोत्यांच्या दागिन्यांवर अथवा मोतीजडीत कपड्यांवर कुठल्याही प्रकारचा स्ट्राँग परफ्युम/ डिओ डायरेक्ट स्प्रे करू नये.मोतीजडीत कपडे घालून झाल्यावर स्वच्छ करून मग मऊ कापडाने पुसावेत आणि आधी एका पातळ कापडाच्या घडीमध्ये घालून नंतर क्लॉथ फोल्डरमध्ये ठेवावेत. असे केल्याने कापडाची व मोत्यांची चमक टिकून राहते.दागिने घालून झाल्यावर जर दागिन्यांवर डाग पडलेले दिसले, तर एक मऊ कापड लिक्विड डिटर्जंटने किंचित ओले करून मोती नीट पुसून घ्यावेत. नंतर परत कोरड्या कापडाने नीट पुसून वाळू द्यावेत. मग वेगळ्या कापडी पाऊचमध्ये अथवा प्लॅस्टिक बॅगमध्ये नीट स्टोअर करावेत.मोत्यांचे हार अथवा गळ्यातले कधीच पाण्यात बुडवून ठेवायचे नाही. त्याने ज्या धाग्यांमध्ये मोती ओवले आहेत, तो धागा आकसतो अथवा कमकुवत होतो, परिणामी माळ तुटण्याची शक्यता असते.मोत्यांचे दागिने स्टोअर करून ठेवताना एक विशेष काळजी घ्यायची, ती म्हणजे हे दागिने इतर सोने-चांदी अथवा ऑक्सिडाइज्ड दागिन्यांबरोबर ठेवायचे नाहीत. ह्यामुळे मोत्यांच्या आउटर लेअरला स्क्रॅच पडून मोती खराब दिसतो.(सोनिया उपासनी फॅशन डिझायनिंग तज्ज्ञ आहेत.)---------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.