वैष्णवी वैद्य-मराठे
पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने निर्माण होणारे आणि स्वतःचे जन्मजात सौंदर्य असणारे मोती हे एकमेव रत्न आहे. समुद्रतळाशी असलेल्या शिंपल्यांमध्ये नैसर्गिकरित्या मोती तयार होतात. व्यावसायिक मूल्याच्या पलीकडे जाऊन, मोती अभिजातता आणि राजेशाहीचे प्रतीक मानले जातात.