प्राची गावस्कर
कृत्रिमरित्या मोती तयार करण्याची पद्धत अस्तित्वात आल्यानंतर मोत्यांची बाजारपेठ वेगाने विस्तारली आहे. भारतातील मोती उत्तम दर्जाचे असल्याने त्यांना जगभरात वाढती मागणी आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर मोतीनिर्यात वाढविण्यावर सरकारनेही भर दिला असून, मोत्यांची शेती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मोत्याचे अर्थकारणातील महत्त्व वाढत आहे.