डॉ. बाळ फोंडके
परोपकार हा रक्तातच भिनलेला असावा, तो जनुकीय वारसाच असावा असा कयास केला गेला आहे. त्याचाच मागोवा घेण्यासाठी वैज्ञानिकांनी डिस्कॉइडियम नावाच्या एका अमिबाला हाताशी धरलं. वैज्ञानिकांना या अमिबांच्या अध्ययनातून आपल्याला पडलेल्या कोड्याचं उत्तर मिळेल, असा विश्वास वाटत होता. त्यातूनच त्यांना अशा दोन जनुकांचा ठावठिकाणा कळला आहे.