डॉ. सदानंद मोरे
यंत्र आणि मानव यांच्यात काही एक बदल करून वेगळेच अस्तित्व सिद्ध होण्याचे दिवस दूर नाहीत. सायबोर्गची कल्पना बहुचर्चित आहे. मानवाचा मेंदू संगणकाला जोडण्याचे किंवा मेंदूतच चिप बसवून घेण्याचे प्रयोग उघड सुरू असण्याच्या बातम्याही आता येत आहेत.