डॉ. वर्षा वर्तकआपल्या शरीरात साधारणपणे ८४० स्नायू, २६५ हाडे आणि २२० मज्जातंतू असतात. त्यांच्या एकत्रित आणि संतुलित साहाय्याने आपण सर्व प्रकारच्या हालचाली करत असतो. शरीरशास्त्रातील या हालचालींचा अभ्यास फिजिओथेरपीमध्ये करण्यात येतो..ख्रिस्तपूर्व ४६० वर्षांपूर्वी ग्रीक डॉक्टर हिपोक्रॅटिस आणि गॅलन ‘मसाज थेरपी’ आणि ‘वॉटर थेरपी’चा वापर करत असत. आणि तेव्हापासून फिजिओथेरपी अस्तित्वात आहे. स्वीडनमध्ये १८१३मध्ये पेर हेन्रिक लिंग याने विशिष्ट व्यायामांवर आधारित उपचारपद्धती सुरु केली, जी जगात ‘स्वीडिश मसाज’ नावाने प्रसिद्ध झाली. १८६० साली स्वीडिश डॉक्टर झँडर याने व्यायाम करवून घेण्यासाठी काही मशिन्स विकसित केली.पहिल्या महायुद्धात अनेक सैनिक जायबंदी झाले. शस्त्रक्रिया, औषधोपचार करूनही त्यांच्या हालचालींवर खूपच मर्यादा होत्या. त्यावेळी अशा सैनिकांवर उपचार म्हणून काही विशिष्ट व्यायाम किंवा स्नायूंच्या हालचाली करून घ्यायला सुरुवात झाली. अमेरिकेत अशा सैनिकांवर उपचार करण्यासाठी झँडर मशिन्स आणि स्वीडिश मसाज थेरपी अशा दोन्हींचा एकत्रित वापर करायला सुरुवात झाली. यातूनच वैद्यकीय शास्त्रावर आधारित भौतिक उपचार म्हणजेच आधुनिक फिजिओथेरपीचा जन्म झाला.आपल्या शरीरात साधारणपणे ८४० स्नायू, २६५ हाडे आणि २२० मज्जातंतू असतात. त्यांच्या एकत्रित आणि संतुलित साहाय्याने आपण सर्व प्रकारच्या हालचाली करत असतो. शरीरशास्त्रातील या हालचालींचा अभ्यास फिजिओथेरपीमध्ये करण्यात येतो. फिजिओथेरपीचा वापर सुरुवातीला हाडे व स्नायूंच्या समस्यांपुरता सीमित होता. १९८० सालानंतर संगणक क्षेत्रातील प्रगतीनंतर फिजिओथेरपीसाठी उपयुक्त अशी विविध प्रकारची मशिन्स विकसित होत गेली. त्यामुळे फिजिओथेरपीची व्याप्ती न्यूरॉलॉजी, हृदयविकार, क्रीडाक्षेत्रातही झपाट्याने वाढत गेली. पण फिजिओथेरपी केवळ शारीरिक समस्यांसाठीच नाही, तर समस्यांमुळे आलेले नैराश्य, मूड स्विंग्स दूर करण्यातही उपयुक्त ठरते. दुखणारा सांधा हालचालींवर मर्यादा आणत असेल तर साहजिकच माणूस चिडचिडा होतो. पण शारीरिक हालचाली जर सुखकर झाल्या तर आपोआपच मनही आनंदी आणि उत्साही राहते. .फिजिओथेरपी सुरू करण्याआधी मला माझ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल का ?हो. तुम्हाला कोणता मोठा आजार असेल किंवा नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली असेल, तर तुम्ही फिजिशिअनचा किंवा तुमच्या सर्जनचा सल्ला अवश्य घ्या. परंतु सांधेदुखी, स्नायू आखडणे किंवा त्यांची ताकद कमी होणे, तोल जाणे यांसारख्या लहानसहान बाबींसाठी फिजिशिअनचा सल्ला न घेता थेट फिजिओथेरपिस्टकडे गेलात तरी चालेल. याचं कारण असं, की फिजिओथेरपीमध्ये उपचार सुरू करण्याआधी तुमची सविस्तर तपासणी होते. त्यामध्ये तुमची मेडिकल हिस्टरी, कामाचं स्वरूप, सध्या होत असलेला त्रास, तुमच्या स्नायूंची ताकद, लवचिकता हे सगळे तपासले जाते. मुख्य म्हणजे, गुडघे न दुखता एक मजला चढता येणे असो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाता येणे असो, तुमचे उद्दिष्ट काय आहे हे जाणून घेऊन त्या अनुषंगानी उपचार सुरू होतात. फक्त गोळ्या घेऊन दुखणे कमी होते, पण फिजिओथेरपिस्ट मुळात दुखणे का उद्भवले याकडे जास्त लक्ष देतात. तर पुढच्या वेळेस कंबरदुखी, गुडघेदुखी यांसारख्या त्रासावर पेनकिलर न घेता फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. .फिजिओथेरपी म्हणजेच मसाज असतो का? त्यात नेमकं काय करतात?नाही, फिजिओथेरपी म्हणजे केवळ मसाज नव्हे. फिजिओथेरपी ही एक विशेष वैद्यकीय शाखा आहे. त्यात सांध्यांची दुखणी, मज्जासंस्थेचे आजार, हृदय आणि फुप्फुसांचे विकार तसेच महिला, खेळाडू आणि प्रौढ व्यक्तींच्या तक्रारी या सर्व बाबींवर उपचार उपलब्ध आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर फिजिओथेरपी म्हणजे व्यायाम आणि शारीरिक हालचालींचे शास्त्र! प्रत्येक दुखण्यावर औषधं न घेता, व्यायामाद्वारे त्या दुखण्यावर मात करून बरे होण्यावर फिजिओथेरपिस्ट भर देतात. गरज भासल्यास व्यायामासोबतच दुखणे कमी करण्यासाठी विशिष्ट इलेक्ट्रिक मशिन्सचादेखील वापर केला जातो. या उपचार पद्धतींचा साइड इफेक्ट नसतो. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे हे व्यायाम सुरू ठेवू शकता.(डॉ. वर्षा वर्तक फिजिओथेरपी क्लिनिकच्या संचालिका आहेत.)***महत्त्वाचेः या लेखमालेत प्रश्नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. या उत्तरांना वैद्यकीय सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधारे कोणतेही वैद्यकीय निर्णय घेऊ नयेत. याबाबतीत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या डॉक्टरांशी किंवा फिजिओथेरपिस्टशी बोलावे व त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावेत.निवेदन : फिजिओथेरपीविषयी तुम्हालाही काही प्रश्न असल्यास ते साप्ताहिक सकाळकडे saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर जरूर पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘फिजिओथेरपीविषयी’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.---------------.First Bond Girl : कसं होतं तिचं खासगी आयुष्य? जाणून घ्या हनी रायडर ऊर्फ मधाळ अर्सुलाबद्दल..!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.