सुजित काळे
कवीला कविता कशी सुचते असं अनेकदा विचारलं जातं. लॉर्ड बायरननं या प्रश्नाला खूप छान उत्तर दिलंय, Poem is an expression of excited passion - कविता हे उत्कट भावनेचं प्रतीक आहे. एखादी व्यक्ती ज्यावेळी स्वतःच्या उत्कट भावना कागदावर उतरवते तेव्हा ती कवी असते.
सध्या वर्तमानपत्र उघडलं किंवा टीव्ही सुरू केला तर कोलकाता, बदलापूर आणि कुणास ठाऊक कुठं कुठं होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या कानावर आदळतात. या प्रकरणातल्या दोषींना तात्काळ फाशी देण्यापासून, न्याय मिळेस्तोवर बंद पुकारण्यापर्यंत आणि स्त्रियांना सक्षम करण्याबरोबरच पुरुषांना संवेदनशील करण्यापर्यंत बरंच काही दिसतंय, छापून येतंय.
हे सारं वाचताना मला डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितेचं स्मरण झालं. आसावरी काकडेंनी तरीही काही बाकी राहील या पुस्तकात विश्वनाथ प्रसादांच्या काही कविता अनुवादित केल्या आहेत. त्या म्हणतात, चांगल्या लेखनाची पूर्वअट चांगला माणूस असणं आहे कारण,