No one leaves home unless
home is the mouth of a shark.
you only run for the border
when you see the whole city
running as well.
वॉर्सन शायर या आफ्रिकी वंशाच्या ब्रिटिश कवयित्रीची ‘Home’ नावाची ही कविता वाचून पोटात अक्षरशः खड्डा पडतो. युद्ध-यादवीमुळे पोळलेल्या प्रदेशांमधून दुसऱ्या देशांत स्थलांतर करणाऱ्या सगळ्या निर्वासितांच्या भावना या ओळींतून या कवयित्रीनं जितक्या समर्पकपणे मांडल्या आहेत, तितकं या विषयावरच्या हजार शब्दांच्या लेखातूनही कदाचित साधलं नसतं. कवितेची ही ताकद किती मोठी आहे!
इंग्रजी कवितेच्या जगात मी तसा जरा उशिरा आणि भीतभीतच प्रवेश केला, पण त्यामुळे माझ्यासमोर जगभरातल्या कवितांचं एक सुंदर जग खुलं झालं.