डॉ. बाळ फोंडके
हिमोफिलियाची जगाला जाणीव करून दिली ती इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरियानं. अर्थात अनवधानानं. तिनं या दूषित जनुकाचा वारसा प्रथम आपल्या अपत्यांपैकी काही जणांना दिला. तिनं एकूण नऊ मुलांना जन्म दिला. चार मुलगे आणि पाच मुली. त्यापैकी तिच्यानंतर सत्तेवर आलेल्या सातव्या एडवर्डसहित तीन मुलगे अबाधित राहिले. पण राजपुत्र लिओपोल्ड या मुलाला मात्र हेमोफिलियाची बाधा झाली.