नेहा लिमये
रवींद्र संगीतातल्या रचनांकडे नुसती नजर टाकली तरी लक्षात येईल, की रवींद्र संगीतात सगळ्या नऊ रसांचा परिपोष आढळतो. शिवाय कीर्तन, भटीयाली, बाउल यांसारख्या बंगालच्या मातीत रुजलेल्या लोकसंगीत प्रकारांचाही समावेश जाणवतो. त्यामुळे हे संगीत फक्त गायकांना किंवा संगीतकारांना मोहवत नाही, तर त्यात वादकही येतात.