पूजा नायक
पाऊस निसर्गाचं एक शाश्वत नृत्य! पावसाच्या सरींमध्ये अनेक भावनांची सरमिसळ असते. ही सरमिसळ अनेक घटनांची साक्षीदार असते. याची सुरुवात होते जमिनीवर पडलेल्या पहिल्या थेंबापासून. कधी रिमझिम बरसत तर कधी धुवांधार कोसळत आठवणींना साद घालणारा हा पाऊस दरवर्षी काही नव्या आठवणींचा साक्षीदार असतो. हा प्रामाणिक साक्षीदार परत पुढच्या वर्षी येऊन कित्येकांच्या कडू-गोड आठवणींना उजाळा देत असतो.