राधिका परांजपे-खाडिलकर
आपल्या बऱ्याचशा पावसाळी आठवणी कोणत्या ना कोणत्या गाण्याशी जोडलेल्या असतात. आठवण कोणतीही असो; लाँग ड्राइव्हला गेल्यावर कारबाहेर बरसणाऱ्या पावसातली, ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर इरिटेट करणाऱ्या पावसातली, अनाठायी बरसल्यावर जवळची माणसं घरी पोहोचेपर्यंत मनाला हुरहूर लावणाऱ्या पावसातली, कधी एखाद्या खास व्यक्तीसोबत डेटला गेल्यावर वातावरण रोमँटिक करणाऱ्या पावसातली, तुमच्या पेटसोबत मनसोक्त भिजला असाल त्या पावसातली, गच्चीत चहाचा कप घेऊन एका तंद्रीत अनुभवलेल्या पावसातली, कामात अत्यंत व्यग्र असताना.