डॉ. आशुतोष जावडेकर
पुस्तकाला पासपोर्ट नसतो, आणि लेखकाच्या कल्पनाशक्तीला तर मुळीच नसतो. त्यामुळे वाचकालादेखील वाचताना एक वेगळी सिद्धी प्राप्त झालेली असते. डोळे मिटले, की त्याला कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही काळात लिलया जाता येतं. आणि त्याने थोडा आधी अभ्यास केला असेल तर तर सुपरसॉनिक विमानाच्या गतीनं जाता येतं!